शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ‘एससी’साठी राखीव

By admin | Updated: June 11, 2016 00:09 IST

आगामी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रार्र्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची सोडत ...

आरक्षण सोडत : राजकीय समीकरणे बदलणारअमरावती : आगामी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रार्र्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची सोडत शुक्रवार १० जून रोजी मंत्रालयातील सह्याद्री अतिथीगृहात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तब्बल २० वर्षांनंतर अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने राजकीय पक्षांची आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. येत्या मार्च महिन्यात म्हणजेच सन २०१७ मध्ये विदर्भातील सात आणि उर्वरित राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाचवेळी होत असल्याने मिनीमंत्रालयाच्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणामी निवडणुकीच्या दृष्टीने आगामी अध्यक्षपदाचे आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार दहा जून रोजी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे नव्या आरक्षणावरच राजकीय घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यानुसारच राजकीय व्यूहरचना आखली जाणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेला स्थापनेपासून आतापर्यंत २९ अध्यक्ष लाभले आहेत. आता सन २०१७ मध्ये ३० व्या अध्यक्षपदासाठी ही सोडत काढली जाणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेत ओबीसी महिला, ओपन महिला, पुरूष, ओपन, ओबीसी, महिला याप्रमाणे अध्यक्ष पदाचे आरक्षण होते. मात्र मागील काही वर्षांतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ लक्षात घेता २० वर्षांतील कालखंडानंतर अनुुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आतापासूनच अनेकांनी बाशिंग बांधले आहेत. यात आगामी अध्यक्षपदाची लॉटरी कुणाला लागेल याकडे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणे नांदी शुक्रवारी मुंबईतील अतिथीगृहात राज्यातील २६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोडत काढली आली गेली. यात अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुुसबचित जातीसाठी राखीव निघाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे राजकीय समीकरणे जुळविण्याचे वारे राजकीय क्षेत्रात वाहू लागले आहेत. यात आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, बसपा, रिपाइं व अन्य पक्षांच्या उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सुरू झाले आहे.