शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात लसीकरणासाठी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

महानगरपालिका हद्दीत केवळ बडनेरातील महापालिकेच्या हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी कोव्हॅक्सिनचा डोज दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. एकमेव केंद्र असल्याने लस टोचून घेण्यासाठी अमरावती, बडनेरा व लगतच्या खेड्यांतील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. पहाटे ४ पासून लोक रांगेत उभे होते. मात्र, सकाळचे दहा वाजले तरी टोकन मिळत नसल्याने गोंधळ सुरू झाला.

ठळक मुद्देपहाटे ४ पासून रांगा, कठोर संचारबंदीलाही ‘खो’, प्रचंड गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : तीन आठवड्यानंतर उपलब्ध झालेल्या कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज घेण्यासाठी येथील हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी यात्रेसमान गर्दी लोटली. प्रचंड गोंधळानंतर फक्त १३० लोकांना लसीकरणाचे टोकण देण्यात आले. कोव्हॅक्सिनसाठी हे एकमेव केंद्र असल्यामुळे गर्दी झाली. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
 महानगरपालिका हद्दीत केवळ बडनेरातील महापालिकेच्या हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी कोव्हॅक्सिनचा डोज दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. एकमेव केंद्र असल्याने लस टोचून घेण्यासाठी अमरावती, बडनेरा व लगतच्या खेड्यांतील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. पहाटे ४ पासून लोक रांगेत उभे होते. मात्र, सकाळचे दहा वाजले तरी टोकन मिळत नसल्याने गोंधळ सुरू झाला. केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गर्दी आटोक्याबाहेर गेल्याने शेवटी पोलिसांचा ताफा येथे आला व त्यानंतर १३० लोकांना टोकन देण्यात आले. उर्वरित निराशेने परत गेले.  केंद्राला महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनीदेखील भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या प्रचंड गर्दीने लसीकरण मोहिमेतील ढिसाळपणा समोर आला. हे लसीकरण केंद्र की कोरोना हॉटस्पॉटचे ठिकाण, अशी शंका उपस्थित करण्यात आली. या केंद्रापासून थोड्या अंतरावरील तेलीपुरा येथे महापालिका शाळेची मोठी जागा आहे. सदर केंद्र येथे हलविल्यास सोयीचे ठरेल, असे नागरिकांनी सांगितले. 

कोव्हॅक्सिनच्या एकमेव केंद्रामुळे झुंबड
बडनेरातील हरिभाऊ वाठ दवाखाना हे कोव्हॅक्सिनच्या लसीकरणासाठी महापालिका अंतर्गत एकमेव केंद्र आहे. अमरावती शहरातदेखील कोव्हॅक्सिनचे दुसरे केंद्र उपलब्ध  असते, तर एवढी  गर्दी झाली नसती. याचे योग्य ते नियोजन प्रशासनाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस