शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नसल्याने आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच महिलेची प्रसूती; मेळघाटातील आरोग्य सेवेचा बोजवारा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:55 IST

Amravati : तालुक्यातील अतिदुर्गम हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क आरोग्य केंद्राच्या वहांड्यातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (अमरावती):
तालुक्यातील अतिदुर्गम हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क आरोग्य केंद्राच्या वहांड्यातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मेळघाटातील आरोग्य सेवेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

तालुक्यातील खुटिदा येथील रहिवासी प्रेमती सतीश बेठेकर यांना १३ जानेवारी रोजी प्रसूती कळा सुरू झाल्या. सकाळी ११:३० च्या सुमारास त्यांचे कुटुंबीय त्यांना तातडीने हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. मात्र, यावेळी आरोग्य केंद्रात ना वैद्यकीय अधिकारी हजर होते, ना कोणी कर्मचारी. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर प्रसूती कळा असह्य झाल्याने अखेर प्रेमती यांची आरोग्य केंद्राच्या वहांड्यातच प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

प्रसूतीनंतरही बराच वेळ आरोग्य केंद्रात कोणीही फिरकले नाही. कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने अखेर हतबल झालेल्या कुटुंबाने माघारी फिरून महिलेला आणि नवजात अर्भकाला पुन्हा घरी नेले. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले, तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

म्हणे दवाखान्यात या प्रसूतीला...!

एकीकडे शासन मेळघाटात कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे भरदिवसा आरोग्य केंद्रात कर्मचारी नसणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. केंद्रात प्रसूतीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश नुकतेच आरोग्य सचिव न्यायालयाच्या आदेशानंतर आल्यावर त्यांनी दिले. मात्र, वादग्रस्त हतरू प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा वादात अडकले आहे.

दोषींवर निलंबनाची मागणी

राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार, हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि बेजबाबदारपणाचा आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या हतरू आरोग्य केंद्रातील संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करून त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

"घटनेची माहिती मिळाली. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत."
- डॉ. स्वप्निल मालखेडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, मेळघाट

English
हिंदी सारांश
Web Title : No doctor: Woman delivers baby in health center verandah.

Web Summary : In Melghat, a pregnant woman delivered her baby in a health center's verandah due to absent doctors and staff. The family was forced to return home without medical assistance. Inquiry ordered after public outcry.
टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदराHealthआरोग्य