चक्कीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:02+5:302021-07-20T04:11:02+5:30

परतवाडा: दळण दळायला आलेल्या महिलेचा पिठाच्या चक्कीच्या पट्टयात अडकून मृत्यू झाल्याची घटना १८ जुलै रोजी ...

Woman dies after getting stuck in mill belt | चक्कीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा मृत्यू

चक्कीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा मृत्यू

परतवाडा: दळण दळायला आलेल्या महिलेचा पिठाच्या चक्कीच्या पट्टयात अडकून मृत्यू झाल्याची घटना १८ जुलै रोजी सायंकाळी परतवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पांढरी येथे घडली. मंगलाय चिलाटे (४२) असे मृताचे नाव आहे.

पांढरी सालेपूर येथील मंगलाय ही गावातीलच भुरा बाबू यांच्या चक्कीवर दळण घेउन गेली होती. चक्की सुरू होती. पट्याच्या ठिकाणी वाकून पाहत असताना ती पिठ गिरणीच्या चाकामध्ये फसली. लाईन बंद करेपर्यंत चक्कीचे पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाला. ह्या घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविला. १९ जुलैला शवविच्छेदन करून मृतदेह तिचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सदानंद मानकर यांचे मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस करीत आहे.

Web Title: Woman dies after getting stuck in mill belt