शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर खत योजना गुंडाळणार?

By admin | Updated: June 30, 2015 00:24 IST

खरीप हंगामात एकाच वेळी शेतकऱ्यांची मागणी वाढते त्या तुलनेत खतांचा पुरवठा होत नाही,..

एकाही गटाची मागणी नाही : गतवर्षीची नापिकी, पीक कर्जासाठी बँकांच्या असहकाराचा परिणामगजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात एकाच वेळी शेतकऱ्यांची मागणी वाढते त्या तुलनेत खतांचा पुरवठा होत नाही, कधी कृत्रिम टंचाईचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खत उपलब्ध करून देण्याची योजना २०१२ पासून सुरू आहे. शेतकरी गटासाठी असणाऱ्या या योजनेत एकाही गटाने मागणी नोंदविलेली नाही. अशीच स्थिती राहिल्यास ही योजना शासनाद्वारा गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी वाढल्यामुळे खत वितरणामध्ये अडचणी निर्माण होतात. वाढती मागणी व मर्यादित खतपुरवठा याचा गैरफायदा घेऊन काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. त्याचप्रमाणे चढ्या भावाने खतांची विक्री केली जाते. खतांसोबत अनावश्यक निविष्ठांची (लिंकींग) शेतकऱ्यांना सक्तीने विक्री केली जाते. खतांची साठेबाजी केली जाते. काही ठिकाणी खतांचा काळाबाजारही होतो.हे टाळण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रास्त भावात व वेळेवर खतपुरवठा होण्यासाठी खरीप हंगामात २०१२ पासून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खत वितरित केली जात आहे.या अंतर्गत कृषी विभागाने रासायनिक खतांचा संरक्षित (बफर स्टॉक) केलेला आहे. बांधावरील खत योजना प्रक्रियेत थेट गावात खते मिळत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो व खत टंचाईलाही आळा बसतो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यांना उद्दिष्ट्यदेखील दिले आहे. खरीप हंगाम सुरू असताना अद्याप एकाही शेतकरी गटाने मागणी नोंदवायला उत्साह दाखविलेला नाही. याला बऱ्याच प्रमाणात दुष्काळी स्थितीदेखील कारणीभूत आहे. मात्र अशीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांना लाभदायी ठरलेली बांधावर खत योजना गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीचाही परिणामसलग तीन वर्षांपासून नापिकी आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही, शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला असताना पीक कर्जासाठी बँकांचा असहकार आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे बांधावर खत योजनेवर परिणाम झाला आहे. १० ते १२ मेट्रिक टनाची हवी मागणीवेळेवर खत मिळण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी १५ दिवस अगोदर पुरवठादार संस्थेकडे मागणी नोंदवायला हवी. ही मागणी वाहतुकीच्या सोईने एकाच प्रकारच्या खताची असावीकाय आहे योजना ?कृषी विभागाद्वारा बफर स्टॉकसाठी रासायनिक खत कंपन्यांना पत्र दिले जाते. त्यानुसार कंपन्या जिल्हास्तरावर कृषी विभागाकडे स्टॉक जमा करतात. जिल्ह्यात टंचाई निर्माण झाल्यास किंवा शेतकरी गटाने मागणी नोंदविल्यास कृषी विभाग शेतकऱ्यांना थेट बांधावर खते पोहचवितात. बांधावर खत योजनेसाठी काही गावांतील शेतकरी गटांद्वारा विचारणा करण्यात आली. मात्र डीडीसह मागणी एकाही गटाने अद्याप नोंदविली नाही.- दत्तात्रेय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.