शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीतील अवैध दारु विक्री थांबविणार कोण?

By admin | Updated: December 20, 2014 00:08 IST

वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाला कायम हद्दपार करण्यासाठी आंदोलक महिलांना १० महिन्यांनंतर यश मिळाले.

अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाला कायम हद्दपार करण्यासाठी आंदोलक महिलांना १० महिन्यांनंतर यश मिळाले. मात्र, परिसरातील काही भागात सुरु असलेल्या अवैध देशी आणि गावठी दारुविक्रीला कोण थांबविणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. वडाळी परिसर दारुमुक्त करण्याचा निर्धार महिलांनी केला असून आता अवैध दारुविक्रीला लगाम लावण्यासाठी पोलिसांवर दबावतंत्र निर्माण केले जाणार असल्याची माहिती आहे.
वडाळीतील काही भागात दोन, चार घरे सोडून राजरोसपणे अवैध दारु विक्री होते. खरे तर अवैध दारुविक्री रोखण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे आहे. मात्र, गत १० महिन्यांपासून येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद असल्याचा अवैध दारु विक्रेत्यांनी पुरेपूर लाभ घेतला. परिसरात या काळात मोठ्या प्रमाणात गावठी दारुविक्री सुरू झाली आहे. महिलांनी धनाढ्य शक्तीविरुद्ध लढा देऊन देशी दारुविक्रीचे दुकान बंद करुन इतिहास रचला. परंतु आता त्यांना वडाळी येथे सुरु असलेल्या गावठी दारुविक्रेत्यांविरुद्ध नव्याने लढा पुकारावा लागणार आहे. या लढाईत वडाळीतील महिलांना स्वकीयांसोबत दोन हात करावे लागतील. परिसरातील प्रबुद्धनगर, परिवारपुरा व शिख मोहल्ला भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशीआणि गावठी दारु विक्रीचे थैमान सुरू आहे. या भागात होत असलेल्या अवैध दारु विक्रीची इंत्यभूत माहिती पोलिसांनी आहे. कोणत्या घरी, कोण अवैध दारु विक्री करतात, याची बारीकसारीक माहिती पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. मात्र चिरिमीरी करुन सुरु असलेली अवैध दारु विक्री थांबविण्यासाठी पोलीस स्वत: पुढाकार घेणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वडाळीत अवैधरित्या विकल्या जाणारी दारु बंद केली तर अतिरिक्त कमाईवर लगाम लागेल? त्यापेक्षा तक्रार येत नाही तोपर्यंत अवैध दारु विक्री सुरु ठेवून पोलीसही मूकपणे हे सर्व बघतील, यात कोणतीही शंका नाही. न्यायालयात प्रकरण असताना प्रशासनाला जेरीस आणले. असे असताना पोलिसांनी वडाळीत अवैध दारु विक्रीचा वाद उफाळण्यापुर्वीच कारवाई करुन दारु विक्रीला कायम लगाम लावले तर बरे होईल, अन्यथा ज्या अवैध दारु विक्रेत्यांकडून पैसे वसुलीकरण्यासाठी पोलिस जातात त्यांच्यावर हल्ले होण्याची दाट शक्यता आहे.