शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वणवा कुणावर शेकणार ?

By admin | Updated: March 11, 2017 00:15 IST

जंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून...

मानवी हस्तक्षेपाचा अंदाज : संशयितांचा शोध घेण्याचे वनविभागाचे आदेशअमोल कोहळे पोहराबंदीजंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून येणाऱ्या काळात वणव्यापासून जंगलांचे रक्षण करण्याकरिता वनविभागाने पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे आगीसाठी कारणीभूत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा परिसरात वणवा पेटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. मागील काही दिवसांत दोन वेळा अशा घटना घडल्यामुळे वनप्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी वणवा पेटला आहे त्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. वडाळी बीट मध्ये मागील चार दिवसांत मध्यरात्रीच्या सुमारास वणव्याची घटना समोर आली होती. यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले होते. वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी हरिचंद्र पाडगाव्हकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, यांनी दोन्ही रेंजमधील वनकर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. पोहरा बीटमधील वणव्याला वनपाल विनोद कोहळे, चिरोडी वनपाल सदानंद पाचगे, इंदला बीटचे वनरक्षक शेंडे, चिरोडीचे वनरक्षक नाईक, बगळे, पवार, वनमजूर शालिक पवार, मंगल जाधव, विसू पठाण, बाबा पळसकर, चव्हाण यांनी नियंत्रणात आणले होते. यामुळे दोन्ही बीटमध्ये असलेला संवाद चांगला असल्याचे दिसून आले आहे. यासाठी वनविभागाने अग्नीशामन दल व पोलीस विभागाची मदत घेतली आहे.वन्यजीवांची हानी नाहीपोहरा बीटमध्ये पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असतानाच प्राण्यांची जीवितहानी तर झाली नाही ना, याचादेखील आढावा घेण्यात आला आहे. यात प्राण्याची हानी झालेली नाही, असे आढळून आल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास घेतला आहे.