शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

यशोमतींविरुद्ध कोण? विरोधकांचे मंथन

By admin | Updated: June 10, 2014 23:46 IST

शिवसेना आणि भाजपच्या मगरमिठीत असलेला तिवसा मतदारसंघ यशोमती ठाकूर यांनी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे खेचून आणला. १५ वर्षे सेना-भाजपचेच राज्य असल्यामुळे विकासकामे करून नेतृत्त्व

गणेश देशमुख - अमरावती
अमरावती - शिवसेना आणि भाजपच्या मगरमिठीत असलेला तिवसा मतदारसंघ यशोमती ठाकूर यांनी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे खेचून आणला. १५ वर्षे सेना-भाजपचेच राज्य असल्यामुळे विकासकामे करून नेतृत्त्व सिद्ध करणे हा एकमेव पर्याय यशोमती ठाकूर यांच्या पुढ्यात होता. त्यांनी विकास कामांचा धडका लावला. भाजप-सेनेच्या 'अच्छे दिन'मुळे नवी उमेद जागलेल्या जुन्या-नव्या इच्छुकांसमोर तार्इंची ही छबी कशी भेदायची हा प्रश्न उभा ठाकला आहे.
जुन्या वलगाव मतदारसंघात शिवसेनेचे संजय बंड १५ वर्षे आणि तिवसा मतदारसंघात भाजपचे साहेबराव तट्टे १० वर्षे आमदार होते. २००९ साली या दोन्ही मतदारसंघांचे विलिनीकरण झाले. नव्या तिवसा मतदारसंघात २००९ साली यशोमती ठाकूर काँग्रेसच्या तिकिटावर २६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्यात. जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असलेल्या यशोमती ठाकूर तिवसा मतदारसंघातील पहिल्या आणि काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आलेल्या विदर्भातील एकमेव महिला आमदार आहेत.
यशोमती यांची मजबूत पकड असलेल्या तिवसा मतदारसंघातून भाजपकडून साहेबराव तट्टे, निवेदिता चौधरी-दिघडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सेनेच्या दिनेश नाना वानखेडे आणि राजेश वानखेडे यांनीही इच्छा प्रदर्शित केली आहे. राजेश वानखेडे हे कंत्राटदार लॉबीतील आहेत. मनसेचे आकाश वऱ्हाडे यांची तयारी जोरात आहे. शासकीय अभियंतापदावरून निवृत्त झालेले रमेश मातकर आमदारकीसाठी उत्सुक आहेत. जातीच्या समिकरणावर त्यांची भिस्त आहे. पक्ष अद्याप ठरलेला नाही. बच्चू कडू यांच्या प्रहारतर्फे संजय देशमुख आणि पवन ऊर्फ छोटू महाराज वसु बाशिंगे बांधून तयार आहेत. देशमुखांच्या कार्यपद्धतीवर जशी पक्षात तशीच पक्षाबाहेरही असलेली नाराजी अडचणीचा मुद्दा आहे.
तिवसा मतदासंघाचे वैशिष्ट्य असे की, मोझरीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वलगाव निर्वाणभूमी असलेले वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज, कौंडण्यपूरच्या आदिशक्ती रुक्मिणी यांची धार्मिक स्थळे याच मतदारसंघात आहेत.
यशोमतींच्या तोडीचा उमेदवार कोण, या विषयावरच अद्याप विरोधी पक्षांत मंथन सुरू आहे. यशोमतींनी उभे केलेले आव्हान भेदण्यासाठी भाजप-सेनेचे 'ब्रेन्स' काय पर्याय शोधतात याकडे जसे अमरावती जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेही लक्ष केंद्रीत आहे.