‘त्या’ रुग्णांच्या नातेवाईकांचे बयाण केव्हा नोंदविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:53+5:30

त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते. ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी एक मार्ग असल्याची चर्चा आता दर्यापूरमध्ये रंगू लागली आहे.

When will the relatives of 'those' patients report the details? | ‘त्या’ रुग्णांच्या नातेवाईकांचे बयाण केव्हा नोंदविणार?

‘त्या’ रुग्णांच्या नातेवाईकांचे बयाण केव्हा नोंदविणार?

Next
ठळक मुद्देसंश्यास्पद मृत्यूचे गूढ कायम : पोलिसांची चौकशी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूमागील गूढ अद्यापही उकलले गेले नाही. दर्यापूर पोलीस अद्याप अंतिम चौकशीपर्यंत पोहोचलेले नाहीत. डॉ. भट्टड यांचा मृतदेह ज्या गेस्ट हाऊसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचे त्यांची पत्नी व कर्मचारी यांच्या बयाणानंतर स्पष्ट झाले, त्याच गेस्ट हाऊसच्या अगदी बाजूला अतिदक्षता विभागात काही विष प्राशान केलेले रुग्ण उपचार घेत होते. त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते.
ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी एक मार्ग असल्याची चर्चा आता दर्यापूरमध्ये रंगू लागली आहे. त्या एक्सरे रुममध्ये वा बाहेर सीसीटीव्ही नाही. एकंदर घटनाक्रम लक्षात घेता, डॉक्टरांचा घातपात तर झाला नसेल ना, या दिशेनेही पोलिसांनी चौकशी करावी, अशी दर्यापूरकांची मागणी आहे. खरेच त्या एक्सरे रुममधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी मार्ग आहे का, त्या रूमच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, तेथून बाहेर निघाल्यानंतरच काही फुटांवरच असलेल्या बँकेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी लक्षात घेतले का, या बाबींवर चर्चा रंगत आहे.

आयसीयूमधील रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे. नोंदवहीतील माहिती मागविली आहे. लवकरच त्यांचे बयाण नोंदविण्यात येईल. गेस्ट हाऊसमध्ये जेथे गळफास घेतला, तेथील दरवाजा डॉक्टरांनी बंद केला होता. आयसीयूचा दरवाजा बाहेरुन बंद होता. चौकशीत दोनच दरवाजे असल्याचे निष्पन्न झाले.
- नरेंद्र डंबाळे, ठाणेदार दर्यापूर

Web Title: When will the relatives of 'those' patients report the details?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू