शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसेसची चाके थांबली; चालक-वाहकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 00:09 IST

बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही.

अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी चालक- वाहकांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. तब्बल चार तास शहर बसेसची चाके थांबली. आरोपींच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून कैफियत मांडली.
शहर बस चालक- वाहकांच्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपूर्वी शेख इमरान ऊर्फ सोनू या चालकाने मोटरसायकलला ‘कट’ मारल्याच्या कारणावरुन तीन ते चार जणांनी बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात मारहाण केली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी चालक शेख इमरान याने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मारहाण करणाऱ्या युवकांकडे असलेल्या पल्सर मोटसायकल गाडीचा क्रमांकही दिला. मात्र तीन दिवसांनंतरही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
याप्रकरणाची तक्रार महापालिका आयुक्त, उपायुक्तांना देण्यात आली आहे. परंतु प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने शहर बसेसचे चालक- वाहकांनी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारार काम बंद आंदोलन सुरु केले. परिणामी चार तासभर शहर बसेसची चाके थांबलीत. सुमारे ३३ शहर बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांना ये- जा करताना फारच त्रास सहन करावा लागला. दरम्यान महापालिका उपायुक्त विनायक औगड यांच्याशी शिवसेना कामगार नेते नितीन तारेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी चालक- वाहकांसह भेट घेतली. सतत चालक, वाहकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रवाशांना सेवा देताना मनोबल खचत चालल्याची बाब प्रशांत वानखडे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मनपा उपायुक्त विनायक औगड यांनी बडनेऱ्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यजाचा प्रयत्न केला. पण, कडू यांनी उपायुक्तांना प्रतिसाद दिला नाही. ही बाब शहर बसेसचे चालक- वाहकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ठाणेदार कडू यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठीचा मोर्चा पोलीस आयुक्तांच्या दिशेने वळविण्यात आला. यावेळी शेखर निर्वाण, अभि गौरकर, गजानन ढगे, अजय स्वामी, अजय डाखोरे, नरेंद्र इंगोले, रवी माहोरे, ज्ञानेश्वर लांडे, विपीन जवंजाळ, दत्ता शेवाणे, सचिन सियाले, ओेम मिश्रा, धनराज बनसोड, गजानन वाघमारे, नितीन भगत, नितीन यादव आदी उपस्थित होते.