शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार सुसाट; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोना नियमांना तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आल्याने सर्वच स्तरावर व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून, बाजारपेठांसह आठवडी बाजारही अनलॉक झाले आहे. मात्र, येथील शुक्रवारी, इतवारा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे. नागरिकांकडूनदेखील नियमांना हरताळ फासला जात आहे. विक्रेतेही मास्क वापरत नसल्याचे  दिसून येत आहे. शारीरिक डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवार बाजारात होते.

शुक्रवार बाजारात विनामास्क वावर
येथील शुक्रवार आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांचा विनामास्क वावर आहे. मासे, भाजीविक्रेते जरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत असले तरी कोरोनाचा धोका मात्र वाढला आहे. नागरिक बिनधास्त विनामास्क वावरताना दिसून येत असून गर्दी वाढत आहे. ही बाब भविष्यात कोराना संसर्गवाढीस कारणीभूत ठरणारी आहे.

इतवारा  बाजारात नियमांचा धुव्वा
लांब विश्रांतीनंतर पुन्हा आठवडी बाजार सुरू झाला असून, येथील इतवारा बाजारात अजूनही काही विक्रेते विनामास्क भाजीपाला विक्री करताना दिसून येत आहे. भाजी बाजारात मोजकेच नागरिक भाजीपाला घेताना मास्क वापरताना दिसून येत आहे. कोरोना नियमांचा धुव्वा उडाल्याचे चित्र दिसून आले.

बडनेरा येथील आठवडी बाजारात कोरोना नाही
बडनेरा नवीवस्तीच्या नेताजी चौक, पिलावन चाळसमाेर आणि झिरी मार्गालगत आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तूसह अन्य साहित्यांची विक्री होते. मात्र, बाजारात  नागरिक विनामास्क जात असून भाजी विक्रेत्यांकडूनही कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर नियंत्रण न आणल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे वास्तव आहे.

संचारबंदी निर्बंध शिथील करण्याच्या नव्या आदेशात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली नाही. तरीही आठवडी बाजार भरत असतील तर ते रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. गर्दी होऊ नये, खबरदारी निश्चित केली आहे.
- नितीन व्यवहारे,
निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार