शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत

By admin | Updated: May 9, 2014 01:40 IST

पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे.

भीमटेकडी येथील जलकुंभावर ताण

अमरावती : पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविला आहे. १२ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे संकेत आहेत.
वाढती लोकसंख्या आणि नागरी वस्तीचा व्याप लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासनाकडे नवीन चार जलकुंभ, विस्तारीत भागात जलवाहिन्या टाकणे, तपोवन येथे जलशुध्दीकरण केंद्र व सिंभोरा येथे पंप बसविणे असा ४४.४४ कोटी रूपयांचा प्रस्ताव नगरोत्थानअंतर्गत पाठविला होता. मात्र, ही योजना मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनीधींचे प्रयत्न कमी पडले. परिणामी बडनेरा, मायानगर, नागपुरी गेट व मालटेकडी येथे नवीन जलकुंभ निर्माण करता आले नाहीत. अशातच बडनेरा जुनीवस्तीतील जलकुंभाचे आयुष्य संपल्याने अप्रिय घटना घडण्यापूर्वीच हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे बडनेरा शहराला नवीवस्तीच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. परंतु पाणी मुबलक असतानादेखील जलकुंभाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. हीच स्थिती गोपालनगर व मायानगरातही आहे.
या भागात अनेक वर्षांपासून जलकुंभ निर्मितीचा प्रस्ताव आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने पाणी पुरवठय़ासंबंधीची कामे करता आली नाहीत. हे शल्य मजीप्राला आहे. बडनेरा व मायानगर येथील उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मजीप्राचा आहे. त्यामुळे मजीप्राने जिल्हाधिकार्‍यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल पत्राव्दारे कळविला आहे. बडनेरा व मायानगर वगळता उर्वरित शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मानस मजीप्राचा आहे. (प्रतिनिधी)
बडनेरा येथे २0 लाख तर मायानगरात १0 लाख रूपये खचरून जलकुंभ बांधायचे आहेत. निधी नसल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. जलकुंभाशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे तुर्तास दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
-अरविंद सोनार, कार्यकारी अभियंता,मजीप्रा
■ भीमटेकडी येथील जलकुंभावरून मायानगर, गोपालनगर, यशोदानगर, मोतीनगर, दस्तुरनगर, जुने बायपास लगतची लोकवस्ती आदी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभावरून क्षमतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असल्याने ताण वाढला आहे. तपोवन येथील जलशुद्धीकरण कें द्रावरून पाणी खेचल्यानंतर जलकुंभाव्दारे टप्प्याटप्प्यात पाणीपुरवठा करण्याची कसरत मजीप्राला करावी लागत आहे.