शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

५५० कोटी खर्च करूनही पाणीटंचाई कायम; चार वर्षांत एकही योजना नाही गेली पूर्णत्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:20 IST

Amravati : 'हर घर जल' देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन योजनेला जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ६२५ गावांसाठी ८५० कोटींच्या २५ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
'हर घर जल' देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन योजनेला जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ६२५ गावांसाठी ८५० कोटींच्या २५ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र, चार वर्षात ५५० कोटी रुपये खर्च होऊनही एकही योजना पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात ५२० गावांतील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

४ वर्षे उलटली, कामे अपूर्ण

अचलपूर, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली आणि अमरावती या ११ तालुक्यांमध्ये २०२१-२२ मध्ये या योजनांचे कार्यारंभआदेश देण्यात आले होते. मात्र, २०२६ मध्येही कुठे पाईपलाईन टाकली तर टाकी नाही, तर कुठे केवळ खोदकाम करून कामे अर्धवट सोडून देण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.

मेळघाटात १०५ गावांचा पाण्यासाठी संघर्ष

सर्वात वाईट स्थिती मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत आहे. येथील १०५ गावांमध्ये आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे.

९ गावांची तहान टँकवर

चिखलदरा तालुक्यातील मोथा, लवादा, खडीमल, गौलखेडा बाजार, बहाद्दरपूर, आकी, महेरीयम, आलाडोह, गवळी ढाणा या गावांतील सहा हजारावर ग्रामस्थांना टैंकरने पाणी पुरविले जात आहे.

पैसा गेला कुठे? ५५० कोटींचा हिशेब द्या

आतापर्यंत ८५० कोटींपैकी ५५० कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जमिनीवर एकही योजना १०० टक्के पूर्ण झालेली दिसत नाही. अर्धवट बांधकामे आणि रखडलेली कामे पाहून हा निधी नेमका कुठे खर्च झाला? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

"मजीप्राकडून जलजीवन मिशनअंतर्गत ६२५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेची कामे केली जात आहेत. कंत्राटदारांची २६ कोटींची देयके प्रलंबित असल्याने योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. आगामी कालावधीत योजना पूर्ण करण्यात येईल."
- सुनील चव्हाण, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Water scarcity persists despite ₹550 crore spent; projects incomplete.

Web Summary : Amravati's Jal Jeevan Mission faces delays; ₹550 crore spent, yet no project is complete. 520 villages face severe water shortage, especially in Melghat, where 105 villages struggle. Villagers question fund usage amidst incomplete works.
टॅग्स :water shortageपाणी कपातwater transportजलवाहतूकAmravatiअमरावती