शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला, मात्र मोठे प्रकल्प तहानलेलेच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:16 IST

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

- संदीप मानकरअमरावती - पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे  सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या ५ आॅगस्ट सकाळ ७ वाजेपर्यंतच्या  नोंदीनुसार धरणांत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊन २३.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ४२.०१ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांत सहा टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ होऊन आता १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  गत आठवड्यापासून रिमझिम तथा मध्यम व काही ठिकाणी दमदार कोसळत असलेल्या पावसांमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. हजारो शेतक-यांनी दुबार पेरणी केली आहे. नेमकी किती शेतकºयांनी दुबार पेरणी केली, या संदर्भाची माहिती कृषी विभाग घेत असल्याची माहिती आहे. २९ जुलै रोजी मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत १५.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यानंतर झालेल्या सार्वत्रिक दमदार पावसामुळे सद्यस्थितीत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे १०.३५ टक्क्यांनी सरासरी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा हा २०.३६ टक्क्यांनी वाढला, तर लघु प्रकल्पांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नसली तरी ६.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. आठवडाभरापूर्वी मोठ्या नऊ प्रकल्पांत १५.३८ टक्के पाणीसाठा होता, तर २४ मध्यम प्रकल्पांत २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ४६९ लघु प्रकल्पांत १०.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्याकारणाने नागरिकांना पाणीसाठा वाढले की नाही, यासंदर्भाची चिंता लागली होती.यंदा मध्यम प्रकल्पांत काही प्रमाणात चांगला पाणीसाठा साचला असून, अद्यापही १५ मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. आठ प्रकल्पांत मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने अनेक तालुक्यांची यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत सद्यस्थितीत १९.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३२.७७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १०.९२ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५६.१० टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ४८.५९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ३६.३० टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या नऊ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्तसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ३३२.९६ दलघमी आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भ