वरुडचा ताज फ्रुट आगीच्या विळख्यात! मुलताई रोडवर अग्नीतांडव

By प्रदीप भाकरे | Updated: April 26, 2026 00:00 IST2026-04-25T23:59:35+5:302026-04-26T00:00:36+5:30

वरुडस्थित मुलताई मार्गावरील ताज फ्रुट कंपनीला शनिवारी रात्री भीषण आगीने कवेत घेतले.

Warud's Taj Fruit catches fire! Fire rages on Multai Road | वरुडचा ताज फ्रुट आगीच्या विळख्यात! मुलताई रोडवर अग्नीतांडव

वरुडचा ताज फ्रुट आगीच्या विळख्यात! मुलताई रोडवर अग्नीतांडव

अमरावती : वरुडस्थित मुलताई मार्गावरील ताज फ्रुट कंपनीला शनिवारी रात्री भीषण आगीने कवेत घेतले. रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले असून, यात कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, घटनेला अनेक तास उलटूनही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.

​शनिवारी रात्री नऊच्या सुमारास जेव्हा संपूर्ण वरुड शहर शांत होत होते, तेव्हा अचानक ताज फ्रुट कंपनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. साठवून ठेवलेला कच्चा माल आणि पॅकेजिंग साहित्यामुळे आगीचा भडका क्षणार्धात उडाला. आकाशात झेपावणारे धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

​आगीची भीषणता इतकी मोठी आहे की स्थानिक यंत्रणा अपुरी पडली. तातडीने वरुडसह, काटोल, नरखेड आणि शेजारच्या मध्य प्रदेशातील मुलताई व बैतुल येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीपासून पाण्याचे शेकडो बंब या आगीवर मारा करत आहेत, मात्र वृत्त लिहेपर्यंत आग धुमसतच असून ती पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवण्यासाठी तगडा बंदोबस्त लावला आहे. सुदैवाने, या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title : वरुड में ताज फ्रूट कंपनी में भीषण आग, भारी नुकसान का अनुमान।

Web Summary : वरुड स्थित ताज फ्रूट कंपनी में भीषण आग लगने से भारी नुकसान हुआ। कई स्थानों से दमकलकर्मी आग बुझाने में जुटे हैं। आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है। किसी के हताहत होने की खबर नहीं है।

Web Title : Massive Fire Engulfs Taj Fruit Company in Warud, Loss Estimated.

Web Summary : A major fire broke out at Taj Fruit Company in Warud, causing extensive damage. Firefighters from multiple locations are battling the blaze, suspected to be caused by a short circuit. No casualties reported.