शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या ‘एसटी’ कल्याण समितीचा दौरा

By admin | Updated: September 10, 2016 00:21 IST

विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा नियोजित दौऱ्याची माहिती जि.प. प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

जिल्हा परिषद : १९ ते २१ सप्टेंबरला जिल्हा दौराअमरावती : विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा नियोजित दौऱ्याची माहिती जि.प. प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही समिती येत्या १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात दाखल होणार आहे. १५ आमदारांचा समावेश असलेली ही समिती जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जि.प. प्रशासनाने यासाठी प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. यापूर्वी या समितीचा दौरा ७ ते ९ जुलैदरम्यान होणार होता. मात्र त्यावेळी २७ जूनला विधिमंडळ सचिवालयाने अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नियोजित दौरा पुढे ढकलल्याचे लेखी संदेश जि.प. प्रशासनाला पाठविला. त्यामुळे प्रशासनाचाही ताण हलका झाला आहे. परंतु आता पुन्हा समितीचा दौरा धडकल्याने जि.प. प्रशासनात धडकी भरली असून समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर तयारी सुरू झाली आहे.पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर आता राज्य विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जि.प.चे विविध विभाग अलर्ट झाले आहेत. या समितीचे प्रमुख म्हणून आ. रूपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात समितीचे सदस्य आ. अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्कल धनारे, प्रभुदास भिलावेकर, संजय पुराम, काशिराम पावरा, चंद्रकात सोनवणे, वैभव पिचड, पांडूरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे व चंद्रकात रघुवंशी आदी १५ जणांचा समितीत समावेश आहे. बुधवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही समिती विश्रामगृहात दाखल होणार आहे. त्यांतर सकाळी ९ ते १० यावेळेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसमवेत अनुुसुचित जमातीच्या कल्याणकारी योजना व अडचणीबाबत अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, व अनुशेष, जातपडताळणी विषयक बाबी तसेच आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अनुसुचित जमातींच्या कल्याणकारी योजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. याशिवाय विद्युत वितरण कंपनी, पोलीस आयुक्त शहर, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील भरती, बदली, आरक्षण व अनुशेष आदी विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. असा कार्यक्रम आहे. (प्रतिनिधी)२० सप्टेंबरला कामांची पाहणीअनुसूचित जमाती कल्याण समितीचे पदाधिकारी जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतिगृह व यंत्रणानिहाय केलेल्या कामांची पाहणी करणार आहे. यात आदिवासी क्षेत्रात उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनाबाबत केलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.२१ ला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकविधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने तीन दिवसीय दौऱ्यात घेतलेल्या आढावा बैठकीत आढळून आलेल्या त्रुटी तसेच आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या त्रुटीसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.