व्यापाऱ्यांच्या कचाट्यात भाजीपाला

By Admin | Updated: December 3, 2014 22:40 IST2014-12-03T22:40:45+5:302014-12-03T22:40:45+5:30

भाजीपाल्याला हल्ली सोन्याचे भाव आले आहेत. उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला महागल्याचा तर्क लावला जात असला तरी तो तत्त्वत: खोटा आहे. या महागाईमागे व्यापाऱ्यांची ‘व्यापार नीती’ असल्याचे

Vegetables in the business of businessmen | व्यापाऱ्यांच्या कचाट्यात भाजीपाला

व्यापाऱ्यांच्या कचाट्यात भाजीपाला

वस्तीनिहाय बदलतात भाजीपाल्याचे दर, दर निर्धारणाचा निकषच नाही
अमरावती : भाजीपाल्याला हल्ली सोन्याचे भाव आले आहेत. उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला महागल्याचा तर्क लावला जात असला तरी तो तत्त्वत: खोटा आहे. या महागाईमागे व्यापाऱ्यांची ‘व्यापार नीती’ असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले.
डिझेल, पेट्रोलच्या किमती कमी होत असतानाही वाहतुकीचे पूर्वीचे दर कायम आहेत. त्यात आता दुष्काळाची भर पडली. जिल्ह्याच्या काही भागांतही भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन होते. पण ते पुरणारे नाही. याचा एकंदरीत परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला. शेतकऱ्यांजवळून भाजीपाला अल्पदरात खरेदी करुन नंतर दलालांच्या माध्यमातून जादा दराने सामान्यांपर्यंत पोहोचतो. यात ना ग्राहकांचा फायदा, ना शेतकऱ्यांचा. केवळ दलाल आणि विक्रेतेच यामध्ये गब्बर होत आहेत. दर निर्धारणाचे कोणतेही एकक भाजीपाल्याबाबत नसल्याने ‘एरियावाईज’ दर बदलताना दिसतात.
बाजार समितीत खरेदीची मर्यादा नसावी
बाजार समितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. येथे किरकोळ भाजी विक्रेत्यांना १० किलोपेक्षा जास्त भाजीपाला खरेदी करण्याची सक्ती केली जाते. येथे भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कर, वाहतूक खर्चाचा बोझा सहन करावा लागतो. त्यामुळे जादा दराने ग्राहकांना भाजीपाला विकण्याखेरीज त्याच्याजवळ गत्यंतर नसते. हा प्रकार रोखण्यासाठी बाजार समितीमध्ये थेट शेतकरी व ग्राहकांमध्येच व्यवहार व्हावेत, असे मत भाजीपाला उत्पादक सुनील शेरेवार यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात उत्पादन; तरीही महाग
वांगी, पानकोबी, फुलकोबी, चवळी या भाज्या ५० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. या भाज्यांचे जिल्ह्यात उत्पादन होते. शेतकऱ्यांकडून कमी दरात व्यापारी खरेदी करतात आणि आवक कमी असल्याचे सांगून ग्राहकांकडून तगडे दर घेतात.

Web Title: Vegetables in the business of businessmen