शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनचे वैैभव कडू, राज गावंडे अव्वल

By admin | Updated: June 17, 2014 23:56 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण

निकाल ८२.५४ टक्के : ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण संपादन करून संयुक्तरीत्या जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त केले. तर अमरावतीच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा विद्यार्थी शुभम् करवा याने ९८ टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमधूून सुमारे ४३ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची एकूण निकालाची टक्केवारी ही ८२.५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण २०९ केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली. ३ ते २७ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदाही निकालाच्या एकूण टक्केवारीत मुलींचा वरचष्मा कायम आहे. बारावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती, हे विशेष.
एकेकाळी सर्वाधिक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित या विषयांत अनुत्तीर्ण होत असत. परंतु यंदा शिक्षण मंडळाने इंग्रजी आणि गणित या बागुलबुवाची भीती दूर करण्यासाठी अभ्यासक्रमात केलेला सुटसुटीत बदल विद्यार्थ्यांच्या चांगलाच पथ्यावर पडलाय.
इंग्रजी विषयाचा सर्वाधिक ९९.०८ टक्के निकाल हा त्याची ग्वाही देतोय. शहरासह ग्रामीण भागातील ५०च्या जवळपास शाळांनी शभंर टक्के यश मिळविले आहे. गेल्या वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित झाला होता. त्या तुलनेत यंदा मुलांना निकालाची प्रचंड प्रतीक्षा करावी लागली. धडधड वाढविणाऱ्या उत्सुकतेनंतर बऱ्याच विलंबाने दहावीचा निकाल घोषित झाला असला तरी मुलांमध्ये उत्साह दिसून आला. अकरावीच्या केंद्रीय पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होईल. (प्रतिनिधी)