शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वन्यप्राण्यांना हुसकाविण्यासाठी कार्बाईडचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 5:00 AM

पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर यासारखे वन्यप्राणी दचकून दूर पळतात.

ठळक मुद्देपोहरा जंगल : वनरक्षकाचा प्रयोग, अवघा २०० रुपये खर्च, शेतकऱ्यांकडूनही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वर्तुळातील उत्तर चिरोडी बीट वनखंड २९८ मधील ३३ कोटीतील रोपवनातून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जात आहे. देशी जुगाडातून वरुडा बीटचे वनरक्षक अतुल धस्कट यांनी यासाठी बंदुक ताणली असून, या बंदुकीच्या प्रचंड आवाजाने वन्यप्राणी रोपवनातून पळत असल्याचे चित्र आहे.याआधी शेतकरी रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर हाकलण्यासाठी शेतकरी हा प्रयोग करीत होते. मात्र पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, चिक्कारा, माकड, रानडुक्कर, भेडकी, सांबर यासारखे वन्यप्राणी दचकून दूर पळतात.रोपे संरक्षणासाठी वनरक्षकाने लढविली शक्कलया बंदुकीमध्ये कार्बाईडचा एक खडा टाकून त्यावर तोडे पाणी टाकल्याने बंदुकीमध्ये पाण्याची वाफ तयार होते व त्यानंतर मागील भागात लावलेल्या लायटरने स्पार्किंग होऊन त्यातून मोठा आवाज एकिवास येतो. या आवाजामुळे वन्यप्राणी दचकून रोपवनातून पळ काढतात. सुरुवातीला त्यांनी दुकानातून एक तीन फूट लांबी व अडीच इंच गोलाई असलेला व दुसरा दीड फूट लांबी व दोन इंच गोलाई असलेले असे दोन पीयूसी पाईप, एक लायटर व अडिच बाय दोनची कपलिंग खरेदी केली. सर्वप्रथम तीन फूट लांबीच्या पाईपाला दीड फूट लांबीचा पाईप जोडून पुढच्या भागाला कपलिंग जोडले व रेती आकाराचा खडा टाकण्यासाठी ३ फुटांच्या पाईपाला मध्यभागी छिद्र तयार केले व मागील भागात प्लास्टिकचे झाकन लावून त्याला छिद्र पाडून त्यामध्ये लायटर जोडण्यात आले. अशाप्रकारे दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये ही बंदुकीची यंत्रणा तयार केल्याचे अतुल धस्कट म्हणाले.

टॅग्स :forest departmentवनविभाग