शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास विभागाचा ओगलेंना ‘धक्का’ !

By admin | Updated: July 16, 2016 00:15 IST

शिक्षण संस्थेला स्वअधिकारात सवलत देणाऱ्या तत्कालिन सहाय्यक आयुक्त राहुल ओगले यांना नगरविकास विभागानेही ‘धक्का’ दिला आहे.

‘तो’ ठराव निलंबित : अभिवेदनास महिन्याची मुदत प्रदीप भाकरे अमरावती शिक्षण संस्थेला स्वअधिकारात सवलत देणाऱ्या तत्कालिन सहाय्यक आयुक्त राहुल ओगले यांना नगरविकास विभागानेही ‘धक्का’ दिला आहे. प्रशासनाकडून त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा प्रस्ताव असतांना महासभेने त्यांना परत कामावर रुजू करुन घ्यावे, असा ठराव पारित केला होता. त्या ठरावाला नगरविकास विभागाने निलंबित केले आहे. महापालिकेतील तत्कालिन सहाय्यक आयुक्त राहुल ओगले यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना शिक्षणकर व रोजगार हमी करात आयुक्तांची परवानगी न घेता, स्वत:च्या अधिकारात नियमबाह्य सवलत दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात ओगले यांच्यावर ठेवलेले दोषारोप सिद्ध झालेत. ओगले यांना सहाय्यक आयुक्तपदावर ठेवणे उचित नाही, असा निर्णय तत्कालिन आयुक्तांनी घेतला. त्यांची पदोन्नतीदेखिल नियमबाह्य असल्याची बाब समोर आली. त्याअनुषंगाने तत्कालिन आयुक्तांनी त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा प्रस्ताव आमसभेसमोर सादर केला. प्रशासनाने ठेवलेला तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला व ओगले यांच्यावर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई न करता त्यांना परत रुजू करुन घेण्यात यावे, असा ठराव १९ मार्च २०१६ च्या आमसभेत पारित करण्यात आला. याबाबत ७ मे रोजी तत्कालिन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी राज्य शासनाकडे तो प्रस्ताव विखंडित करण्यासाठी पाठविला. आमसभेने पारित केलेला हा ठराव प्रशासकीय शिस्तीच्या विरुद्ध असल्याचा शेरा आयुक्तांनी त्या प्रस्तावावर दिला होता. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने निर्णय दिला आहे.