विद्युतनगरातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:46+5:302020-12-31T04:14:46+5:30

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील मेघे कॉम्प्लेक्स विद्युतनगर येथून २० हजार रुपये किमतीची एमएच २७ एएल ०५१५ क्रमांकाची दुचाकी ...

Two-wheeler theft from Vidyutnagar | विद्युतनगरातून दुचाकी चोरी

विद्युतनगरातून दुचाकी चोरी

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील मेघे कॉम्प्लेक्स विद्युतनगर येथून २० हजार रुपये किमतीची एमएच २७ एएल ०५१५ क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी सतीशचंद्र पुंजालाल सराफ (७१, रा. फ्रेन्ड्स कॉलनी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------------------------------------

क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण

अमरावती : एका युवकाला क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण केल्याची घटना छांगाणीनगरात मंगळवारी घडली. पराग चिमोटे (रा. छांगाणीनगर) असे आरोेपीचे नाव आहे. फिर्यादी चंद्रकांत उमाकांत बाळापुरे (३२, रा. छांगाणीनगर) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा आहे.

----------------------------------------------------------

तडीपार आरोपी ताब्यात

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी पंचशीलनगरात कारवाई करून एका तडीपारास ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली. धम्मदीप ऊर्फ हृतिक सिद्धार्थ भालेकर (२१, रा. पंचशीलनगर) असे आरोपीचे नाव आहे. शहर हद्दीतून तडीपार असतानाही पोलिसांनी केलेल्या कोंबिंग अपरेशनमध्ये तो राहत्या घरी मिळून आला.

--------------------------------

संशयित आरोपी ताब्यात

अमरावती : चोरीसारखा दखलपात्र गुन्ह्याच्या उद्देशाने रात्री फिरत असलेल्या आरोपीला वलगाव पोलिसांनी मारवाडीपुऱ्यातून मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. नसरूल्ला खॉ, बशीर खॉ (४२, रा. बाजारपुरा वलगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------------------------------

Web Title: Two-wheeler theft from Vidyutnagar