शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका बेडवर दोन प्रसूता!

By admin | Updated: May 17, 2014 23:12 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात नि:शुल्क प्रसूती होत असल्याने या रूग्णालयात प्रसूतीकरिता येणार्‍या गोरगरीब महिला रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात नि:शुल्क प्रसूती होत असल्याने या रूग्णालयात प्रसूतीकरिता येणार्‍या गोरगरीब  महिला रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे एका बेडवर दोन प्रसूत महिलांना ठेवण्याची वेळ आली  आहे. परिणामी रुग्णांची गैरसोय होत आहे. 
उन्हाळ्यात प्रसूतीची संख्या वाढते. त्या तुलनेत सोयी मात्र उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. जिल्हा स्त्री  रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे रूग्णालय  प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गोरगरीब महिलांना अत्यल्प शुल्कात अद्ययावत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी  शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाकडून महिलांना योग्य  आरोग्य सेवा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 
या रुग्णालयात ६ वॉर्ड असून दररोज शेकडो महिला  प्रसूतीसह अन्य उपचारांकरिता दाखल होत असतात.  तपासणीसाठी येणार्‍या महिलांना गरजेनुसार वॉर्डात दाखल करुन घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून  प्रसूतीकरिता दाखल महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वॉर्डांमधील बेड कमी पडत आहेत. त्यामुळे एका  खाटावर दोन प्रसूत महिलांना उपचार घ्यावे लागत आहे. ही अवस्था रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये पाहायला  मिळाली. अन्य वॉर्डांमध्येही कमी-जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे.  जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ २00  खाटांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत महिला रूग्णांची संख्या वाढल्याने हे बेड तोकडे पडू  लागले आहेत. डफरीन रूग्णालय या ना त्या कारणाने सदैव चर्चेत असते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे   प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकांसह महिला दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. अनेकदा रूग्णांचे नातेवाईक  आक्रमक होतात आणि रूग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. कित्येकदा तणावाचे वातावरण निर्माण होते.  काही काळ हा प्रकार चर्चेत असतो. त्यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे होते. रुग्णालयाच्या साफसफाईचा मुद्याही वारंवार  चर्चेत असतो. येथील प्रसूत महिलांकडून कर्मचारी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही रूग्णांच्या  नातलगांकडून केला जातो. रुग्णालयात औषधोपचाराची सोय असूनही बाहेरून औषधी आणण्यास बाध्य केले  जाते.(प्रतिनिधी)