शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
4
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
5
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
6
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
7
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
8
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
9
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
10
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
11
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
12
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
13
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
14
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
15
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
16
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
17
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
18
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
19
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
20
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्यासह अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त

By admin | Updated: May 18, 2014 23:11 IST

व्यवहारात चलनासाठी आणलेल्या अडीच लाखांच्या बनावट नोटा, देशी कट्टा व सात जिवंत काडतूस जप्त करुन चार जणांना पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी पोस्ट मास्तर आहे.

चार आरोपी अटकेत : अमरावती जिल्ह्यात बनावट नोटांचा काळाबाजार

अमरावती : व्यवहारात चलनासाठी आणलेल्या अडीच लाखांच्या बनावट नोटा, देशी कट्टा व सात जिवंत काडतूस जप्त करुन चार जणांना पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी पोस्ट मास्तर आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ग्रामीण पथकाने शनिवारी दिवसभर केली. आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात बनावट नोटांचा काळाबाजार करणार्‍या आरोपींमध्ये श्रीकृ ष्ण पांडुरंग रायबोले (५६, रा. आनंदनगर, दर्यापूर), सचिन केशव शंकरपुरे (रा.तोंगलाबाद, दर्यापूर, ह. मु. सिंधी कॅम्प, कारंजा लाड), राजा ऊर्फ मोहम्मद राहील मो. शफी (२८, रा.चौधरी मैदान, चावलमंडी, अचलपूर), शेख मुन्नू शेख सलिम (रा. गवळीपुरा) या चौघांचा समावेश आहे. श्रीकृष्ण रायबोले हा नकली नोटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. बनावट नोटांचे अमरावतीत कनेक्शन आरोपी राजा ऊर्फ मो.राहील याला पोलिसांनी अमरावतीच्या बसस्थानकातून अटक केली. त्याने बनावट नोटा अमरावती शहरातून वसीम चायना व शेख मुन्नू याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी राजाच्या माध्यमातून वसीम व शेख मुन्नू याला भेटण्यासाठी बोलाविले. दोघांनी गाडगेनगरमध्ये भेटायला येत असल्याचे राजाला सांगितले. परंतु वसीमने ऐनवेळी प्लान बदलविला व पीडीएमसी समोरचे स्थळ निश्चित केले. तेथे पोलिसांनी सापळा रचल्याचे लक्षात येताच वसीमने तेथून पोबारा केला. मात्र, शेख मुन्नुला पकडण्यात पोेलिसांना यश आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे मॅग्झीन असलेले पिस्टल व त्यातील ७.६५ एम. एम चे ७ जिवंत काडतूस जप्त केले. पोस्ट मास्तरकडून ५० हजारांच्या नोटा जप्त श्रीकृष्ण रायबोले हा पूर्वी होमगार्ड होता. त्याने कारंजा लाड येथे पोस्ट मास्तर असलेला त्याचा साथीदार सचिन शंकरपुरे याला ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या होत्या. परंतु या नोटा चलनात न आल्याने तो नोटा घेऊन परतत असल्याची माहिती श्रीकृष्णने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सचिनलाही अटक केली व त्याच्याकडून ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.