शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By admin | Updated: September 5, 2016 00:28 IST

पिकाचा ७० टक्के जोखीमस्तर देय असणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ४० हजार ३९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला...

पंतप्रधान पीक विमा योजना : विमा हप्त्यापोटी २४ कोटी ३६ लाखांचा भरणा अमरावती : पिकाचा ७० टक्के जोखीमस्तर देय असणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ४० हजार ३९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला व विमा हप्त्यापोटी २४ कोटी ३६ लाख ३२ हजारांचा भरणा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट व जिल्ह्यातील एकूण शेतकरी संख्येच्या ५१ टक्के शेतकऱ्यांनी यंदा पिक विमा काढला आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग तसेच पीक पेरणीपूर्व व काढणी पश्चात नुकसान आदी कारणांनी पिकांचे नुकसान आदिवासींना पीक विम्याचे संरक्षण कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असणाऱ्या या योजनेत यंदा एक लाख ३१ हजार ९४८ शेतकऱ्यांना पीक विमा काढून १७ कोटी २२ लाख ६६ हजारांचा विमा बॅँकांनी परस्पर कापला आहे. ऐच्छिक गैरअर्जदार, एक लाख ८ हजार ४४६ शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा काढला. हप्त्यापोटी ७ कोटी १३ लाख ६६ हजारांचा भरणा केला आहे. एकूण २ लाख ४० हजार ३९४ शेतकऱ्यांनी २४ कोटी ३६ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा केला. एकूण २० व्यावसायिक बॅँकांमध्ये एक लाख ६ हजार ८६३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढून १२ कोटी ७६ लाख ३३ हजारांचा विमा हप्त्याचा भरणा केला आहे. यामध्ये ६६ हजार २४९ कर्जवार शेतकऱ्यांनी ९ कोटी ४९ लाख ९६ हजार व गैर कर्जदार ४० हजार ६१९ शेतकऱ्यांनी ३ कोटी २६ लाख ३७ हजाराचा भरणा केला आहे. खासगी बॅँकांत १ हजार ८१ कर्जदार शेतकऱ्यांनी २८ लाख १६ हजार रुपये हप्त्याचा भरणा केला. ग्रामीण बॅँकामध्ये १ हजार ६१८ शेतकऱ्यांनी २४ लाख ३२ हजार व गैरकर्जदार ६०६ शेतकऱ्यांनी ५ लाख १६ हजार असा एकूण २ हजार २२४ शेतकऱ्यांनी २९ लाख ४८ हजारांचा विमा हफ्त्याचा भरणा केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ६३ हजार कर्जदार शेतकऱ्यांनी ७ कोटी २० लाख २२ हजार व गैरकर्जदार ६७ हजार २२१ शेतकऱ्यांनी ३ कोटी ८२१३ हजार असा एकूण १ लाख ३० हजार २१ शेतकऱ्यांनी ११ कोटी २ लाख ३५ हजार रुपयांचा भरणा विमा हफ्त्यापोटी केला आहे. या पीक विमा योजनेत प्रथम काढणी पश्चात नुकसान संरक्षित केले आहे. यात शेतमालाचे चक्रीवादळ, अवेळी पाऊस, यामुळे कापणी व काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)नैसर्गिक आपत्तीसाठी ८ हजार हेक्टरची मदत केव्हा ? यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर येऊन ८ हजार हेक्टरमधील पिके खरडली गेली व शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या पीक विमा योजनेच्या निकषानुसार या बाधित क्षेत्रासाठी २५ टक्केच्या मर्यादेपर्यंत भरपाई मिळायला पाहिजे, मात्र अद्याप पर्र्यंत ही भरपाई मिळालेली नाही. अशी होणार भरपाई निश्चित राज्य शासनाकडून पिकाच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीमार्फत उंबरठा उत्पन्न व चालू वर्षाचे सरासरी विचारून ३ आठवड्याच्या आत भरपाई निश्चित केली जाते. यामध्ये उबंरठा उत्पन्न वजा प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पन्न भागिले उबंरठा उत्पन्न व गुणीले विमा संरक्षित रक्कम, असे भरपाई काढण्याचे सूत्र आहे.असा आहे बँँकानिहाय शेतकऱ्यांचा सहभाग अलाहाबाद बॅँकेमध्ये ४,१९३,शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. आंध्रामध्ये ११, बॅँक आॅफ बडोदा ११८५, बॅँक आॅफ इंडिया ३१६९, बॅँक आॅफ महाराष्ट्र २४,९७५, कॅनरा बॅँक ५८७,सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया २९,५०५, कार्पोरेशन बॅँक २३३, देना बॅँक २८९४, आयडीबीआय बॅँक ५२९, इंडियन बॅँक १४७२, इंडियन ओव्हरसीज बॅँक ४७६, पंजाब नॅशनल बॅँक १४२, स्टेट बॅँक आॅफ हैद्राबाद ५५, स्टेट बॅँक आॅफ इंडिया ३२३७६, सिंडीकेट बॅँक २६, युको बॅँक २१, युनियन बॅँक आॅफ इंडिया ३९०२, विजया बॅँक १७, एचडीएफसी बॅँक १०७६, विदर्भ कोकण ग्रामीण बॅँकेत २२२४ शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे.