शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बंदीजनांनी घेतला तुळस रोपवनाचा ध्यास

By admin | Updated: September 14, 2016 00:12 IST

ज्या हाताला गुन्हेगारीचा कलंक लागला, आता तेच हात पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले आहेत.

पर्यावरण संवर्धन : स्वागत तुळस रोपाने होणारअमरावती : ज्या हाताला गुन्हेगारीचा कलंक लागला, आता तेच हात पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदजनांनी तुळस रोपवनाचा संकल्प घेतला आहे. ‘एक कैदी, एक तुळस’ हा जागर चार भिंतीच्या आत सुरू आहे. टाकाऊ दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर तुळस रोपवनांसाठी केला जाणार आहे, हे विशेष.तुळस रोपाचे आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळसीचे दोन पाने खाल्ली की, खोकला, घशातील आजार दूर होतात. तुळस रापटे हे पर्यावरण संवर्धनासाठी लाभदायक ठरते. तुळसाचे एक रोपटे काय किमया करु शकते, ही बाब कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी जाणली आहे. कारागृहाचा आत केवळ गुन्हेगारच नव्हे तर पर्यावरणाशी बांधिलकी जोपासणारी व्यक्तीही आहेत, हे सिद्ध करण्यासाठी अधीक्षक ढोले यांनी कारागृह परिसर तुळसमय करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या निसर्गप्रेमाला बंदीजनांनीदेखील सकारात्मक घेतले. तुळस रोपटे जगविण्याचा मानस त्यांनी व्यक्त करताच शेकडो बंदी पुढे आलेत. पर्यावरण सुरक्षित तर आपण सुरक्षित असे म्हणत बंदीजनांनी तुळस रोपवन जगविण्याचा संकल्प घेतला. संतोष नरोटे, गोपीचंद खजुरे, श्रीकृष्णा बघे, शाम नेतनराव यांच्यासह अनेक बंदीजन तुळस रोपवनासाठी पुढे आले. त्यांनी प्रत्येकी १०० तुळस रोपवन जगविण्याचा सकल्प केला. प्रायोगिक तत्त्वावर तुळस रोपवन तयार केले जाणार असून कारागृहात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला तुळस रोपटे स्वागतादरम्यान भेट म्हणून दिले जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे बंदीजनांमध्ये आनंद संचारला आहे. यासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, शरद माळशिकारे, रेवनाथ कानडे, संजय गणोरकर, सुभेदार तिवस्कर, राठोड, भूषण कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)दुधाच्या टाकाऊ पिशव्यांचा वापर कारागृहात दरदिवशी शेकडो दुधाच्या टाकाऊ पिशव्या निघतात. त्यामुळे या टाकाऊ प्लास्टिक पिशव्यांत तुळस रोपवनाचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. या पिशव्या कचऱ्यात टाकण्याऐवजी ाात तुळस रोपटे जगविले जाणार आहे. बंदीजनांच्या हाताला तुळस जगविण्याचा आनंद असून हे रोपटे भविष्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्धदेखील केले जाणार आहे.पर्यावरणाच्या असमतोलाने नुकसानीच्या घटना घडत आहे. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.तुळस हे पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त असल्याने कारागृहात त्याचे संगोपन केले जाणार आहे. - भाईदास ढोले, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह