शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने चिरडले, शिक्षक दाम्पत्य जागीच ठार

By admin | Updated: July 3, 2015 00:30 IST

गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत...

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत शिक्षक दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी हा अपघात घडला. ट्रकची धडक एवढी जबर होती की, दाम्पत्यापैकी महिलेचे शिरच धडापासून वेगळे झाले होते. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा नुसता थरकाप उडाला. सुभाष प्रल्हाद हुमने (४२) व सरोजिनी सुभाष हुमने (३८, रा. केवल कॉलनी) अशी अपघातात मरण पावलेल्या शिक्षक पती-पत्नींची नावे आहेत. दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. गुरूवारी सकाळी पत्नी सरोजिनी यांना शाळेत जाण्याकरिता डेपोमध्ये सोडून सुभाष हुमने हे स्वत: ‘एमएससीआयटी’ ची परीक्षा देण्याकरिता जाणार होते. दुचाकी क्र.एम.एच.२७-ए.जी.-५१११ ने हे दाम्पत्य आशियाड कॉलनीनजीक पोहोचताच तिवस्याहून अमरावतीकडे रेतीने भरलेला ट्रक क्र. एम.एच.-३६-एफ.-९६३ येत होता. या ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून एक सायकलस्वार दुचाकीसमोर आला.ट्रकचालकाला अटकअमरावती : सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दोघेही ट्रकच्या मागच्या चाकात आले. अपघात एवढा भयंकर होता की पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच स्थितीवर नियंत्रण मिळविले. आरोपी ट्रकचालक संतोष देवकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)