शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या २१ टन चामड्यासह ट्रक पकडला

By admin | Updated: August 26, 2016 23:54 IST

मध्यप्रदेशातील बडवानी येथून २१ टन जनावरांचे चामडे भरून नेणाऱ्या ट्रकला एपीएमसी नाक्यावर वास येत असल्याने पकडण्यात आले.

धारणी : मध्यप्रदेशातील बडवानी येथून २१ टन जनावरांचे चामडे भरून नेणाऱ्या ट्रकला एपीएमसी नाक्यावर वास येत असल्याने पकडण्यात आले. पोलिसांनी ट्रक अडवून तपासणीकरिता पशु वैद्यकीय डॉक्टरांचा अभिप्राय मागितल्याने एकच खळबळ उडली आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी करीत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर (२१ टन) चामडे आले कुठून, असा सवाल निर्माण झाला आहे. बडवानी जि. खरगोन (म.प्र.) येथून कसरावद रोडवरून एका कॉलनीतून २१ टन जनावरांचे चामडे भरून ट्रक क्रमांक एमपी-०९-एचजी-१८०३ क्रमांकाचा १२ चाकी ट्रक काल दुपारी निघाला. त्या ट्रकने मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील भोकरवाडी व धारणी येथील वनविभागाच्या नाका पास करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकावर पोहचला. आज सकाळी ९ वाजता दरम्यान नाक्यावर हा ट्रक उभा असताना प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. दुर्गंधीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याविषयी सूचना दिली. याप्रकरणी पोलिसांनी पशू चिकित्सकांकडून तपासणी करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढे पोलीस कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशात पूर्वीपासूनच गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अमलात आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा यावर्षी हा कायदा अमलात आणला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात प्रतिबंध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर चामड्याची वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी होती. ट्रकमध्ये असलेल्या चामड्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. याविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता एका जनावराची चामडी २ ते अडीच हजार रुपये आहे. त्यानुसार एकूण किंमत २० लाखांच्या घरात असल्याची चर्चा आहे.