शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राज्यात टॅंकरवारी सुरूच; ३,२९१ गाववाडे तहानलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 15:32 IST

मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अमरावती : मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जूनच्या तिस-या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती पालटण्याचे संकेत आहेत. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.गतवर्षी १२ जूनला १,७९८ गावे आणि ४,२८१ गावांना १,६६६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा टँकरची संख्या वाढली असली तरी टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे.कोकणातील पाच जिल्ह्यांतील २२७ गावे व ६३० वाड्यांमध्ये १०५ टँकरने, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ३१६ गावे व ३५८ वाड्यांमध्ये २६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ४३० गाववाड्यांमध्ये ७५ टँकर, औरंगाबाद विभागातील ९५३ गाववाड्यांमध्ये सर्वाधिक ९६२ टँकरने, तर नागपूर विभागातील ४१ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमरावती विभागातील ३३६ गावांमध्ये ३३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. अर्थात राज्यातील १,७८५ गावे व १,५०६ वाड्यांमध्ये १९९ शासकीय टँकर व १,५७८ खासगी अशा १७७७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही आकडेवारी ११ जूनपर्यंतची आहे.

१९.०२ टक्के उपयुक्त जलसाठाराज्यातील ३,२४६ जलाशयांमध्ये १२ जूनअखेर केवळ १९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील एकूण ४४३ प्रकल्पांमध्ये १६.३४, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये ४०.३४, नागपूरमधील ३८५ प्रकल्पांमध्ये ११.३३, नाशिकमधील ५६१ प्रकल्पांमध्ये १९.६६, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये १७.२९ टक्के, तर मराठवाड्यातील ९५७ प्रकल्पांमध्ये केवळ १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेAmravatiअमरावतीMarathwadaमराठवाडाnagpurनागपूरNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल