शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या वीज कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंंदोलन

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके आॅक्सीजनवर असताना शेतातील कृषिपंप बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगळवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांनी

चांदूररेल्वे : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके आॅक्सीजनवर असताना शेतातील कृषिपंप बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगळवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात तीन तास ठिय्या दिला. पावसाच्या दडीमुळे व दुबार, तिबार पेरणी केलेली खरीप पिके सुकू लागली. विहिरीतील विद्युत पंप बंद असल्यामुळे उपलब्ध असलेले पाणीही शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरता येत नाही. वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी हजारो शेतकरी मंगळवारी उपविभागीय अभियंता फडणवीस यांचे कार्यालयात धडकले. मंडळाने दिलेले सेवक हे नेमून दिलेल्या गावाला राहात नाही व पैसे मागतात व तक्रारीची दखल नाही अशा आवेशपूर्ण तक्रारी यावेळी करण्यात आल्या. तीन तास विद्युत मंडळात गोंधळाचे वातावरण होते. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधण्यात आला. तालुक्यातील रोहीत्र बंद आहे जे आहे त्यावर किटकॅट नाही, केबल नाही व जुनाट साहित्य आहे त्यामुळे लाईन चालू असूनही रोहीत्र बंद राहते याची सुधारणा करा नाही तर शेतकऱ्याच्या पुढील होणाऱ्या अनर्थ परिणामासाठी तयार राहा, असा इशारा आंदोलकांनी दिला. दोन दिवसात समस्या सोडवू, असे आश्वासन विद्युत अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, उमेश केने, प्रवीण घुईखेडकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)