शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.

ठळक मुद्देमेळघाट : महावितरणचा कारभार, जारिदा उपकेंद्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महावितरणच्या बेताल कारभाराचा फटका मेळघाटच्या अतिदुर्गम तीन गावांना बसला आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणारी केबल वनविभागाच्या वृक्षतोड मोहिमेत तुटल्याने ही गावे तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपासून जारिदा उपकेंद्र अधिकाऱ्यांविना वाऱ्यावर आले आहे.तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.अचलपूर येथील कार्यकारी अभियंता या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिखलदरा पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी तक्रारीत केला आहे. एकताई, सलिता, भांडूम या गावांमध्ये पूर्णत: अंधाराचे साम्राज्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हिंस्त्र वन्यप्राणी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून गावानजीक येतात. अंधारात ते दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भीतीखाली आदिवासी जगत आहेत.वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा योजना व पीठ गिरणीसुद्धा बंद पडल्या आहेत. याशिवाय वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना इतरांशी संपर्क साधणेदेखील अवघड ठरले असल्याने समस्यांत भर पडली आहे. वनविभागामार्फत जंगलात वृक्षतोड करण्यात आली. त्यामध्ये सदर केबल तुटला. ती जोडणी करण्यासाठी संबंधित कंपनीला आवश्यक असलेले मटेरियल लॉकडाऊनमध्ये मिळाले नाही . लवकरच तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.- व्ही .एम. बागडे,सहायक अभियंता (महावितरण), परतवाडा

टॅग्स :electricityवीज