शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

४० आरोग्य केंद्रांमध्ये दिवसभरात तीन हजारांवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू नये तसेच गर्दी होऊ नये, यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आदेश शासनाने व जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार नवीन लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध तालुक्यांतील आरोग्य केंद्रांमध्ये सुरू केली आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांसह पात्र लाभार्थींनी घेतली लस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणास सुरुवात झाली असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील ५९ पैकी सध्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे २ हजार ७२९ हजारांवर ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली.लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू नये तसेच गर्दी होऊ नये, यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आदेश शासनाने व जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार नवीन लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध तालुक्यांतील आरोग्य केंद्रांमध्ये सुरू केली आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १५ मार्च रोजी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांत  २ हजार ७२९ जेष्ठ नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. 

१५ मार्च रोजीचे पीएचसीनिहाय लसीकरणधामणगाव गढी ५०, पथ्रोट १२३, येसूर्णा ५४, वलगाव ९३, सातेगाव ३८, आसरा ४९, खोलापूर ५२, गणोरी ६७, ब्राम्हणवाडा थडी ४१, करजगाव ५०, तळवेल ४०, शिरजगाव कसबा ६०, आमला विश्वेश्वर ९४, पळसखेड ३९, घुईखेड ६०, चंद्रपूर ३२, रामतीर्थ ७६, येवदा ११८, अंजनसिंगी १०२, मंगरूळ दस्तगीर १५६, निंबोली ६४, तळेगाव दशासर ६४, अंबाडा ३५, हिवरखेड ४७, खेड ५४, नेरपिंगळाई ९६, विचोरी ४८, लोणी टाकळी ६४, मंगरूळ चव्हाळा ३७, पापळ ७४, मार्डी ५०, तळेगाव ठाकूर २५०, लोणी ९३, राजुरा बाजार २१५, शेंदूरजना घाट १०, चुरणी १०, हरिसाल १८, कलमखार ३४, साद्राबाडी ६२.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा जिल्ह्यातील ५९ पैकी ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करण्यात आली आहे. लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. आणखी केंद्रे वाढवू. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटत असला तरी यात वाढ होणार आहे, हे नक्की. लसीकरणासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज आहे.- डॉ. दिलीप रणमले जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस