शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निवडणूक कामात हयगय खपविली जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक अधिकारी : क्षेत्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक प्रक्रियेत आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रक्रियेबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन विविध आदेश व सूचनांद्वारे केले आहे. त्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करावे. त्यात काहीही बदल किंवा शॉर्टकट वापरू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटचे कार्य, मॉकपोल यांसह निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक विविध बाबींची उजळणी या कार्यशाळेत करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत प्रात्यक्षिकही अधिकारी व कर्मचाºयांकडून करून घेतले.निवडणुकीच्या अनुषंगाने सादर करावयाची आकडेवारी काटेकोर असावी. ती वेळोवेळी तपासून घ्यावी. ईव्हीएम यंत्रणेच्या सुरक्षेसाठी संपूर्ण दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या कामात एकही त्रुटी राहता कामा नये, असे निर्देश शैलेश नवाल यांनी येथे दिले. गत लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चांगले काम करून उत्तमरीत्या प्रक्रिया पार पाडली. याही निवडणुकीत सर्वांनी समन्वयाने काम करून प्रक्रिया पार पाडावी, २असे आवाहनही त्यांनी केले.सुमारे २७५ क्षेत्र अधिकाºयांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. संपूर्ण प्रक्रियेबाबत क्षेत्र अधिकाºयांनी घ्यावयाच्या दक्षता व जबाबदारीबाबत माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.तिवस्याचे आरओ नरेंद्र फुलझेले हे जिल्ह्यासाठी मास्टर ट्रेनर आहेत. दरम्यान, मनुष्यबळाची डेटा एंट्री सुरू आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019