शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीचे परीक्षण आमच्या शरीरावर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या निवेदनातून कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती मांडली आहे. कोविड-१९ मुळे वैश्विक, जैविक आपत्ती आलेली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पत्र : तिघांकडून राष्ट्रसेवेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना कोविड-१९ लसीचे परीक्षण हे पशू- प्राण्यांवर न करता मनुष्यावर करावे. त्याकरिता आम्ही तिघे जण तयार आहोत. आमच्या शरीरावर लसीचे परीक्षण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रभक्त असलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर केले आहे.अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या निवेदनातून कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती मांडली आहे. कोविड-१९ मुळे वैश्विक, जैविक आपत्ती आलेली आहे. देशात ही महामारी झपाट्याने पसरत असताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. अद्यापही कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात आलेली नाही. काही शास्त्रज्ञांनी ही लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. मात्र, या लसीचे परीक्षण ते पशुंवर करणार आहेत. पशू, प्राण्यांवर अशा लसीचे परीक्षण होत असेल तर, १३५ कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी ही नामुष्की आहे.मानवी जीवनासाठी नेहमीच मूक पशू, प्राण्यांवर प्रयोग केला जातो, हे योग्य नाही. त्यामुळे लाखो लोकांचे बळी घेणाºया कोरोना लसीचे परीक्षण करण्यासाठी आम्ही शरीर देण्यास तयार आहोत. केंद्र सरकारने परवानगी देऊन देश कर्तव्य सेवेची संधी आम्हाला द्यावी, अशी मागणी या तिघांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठविले आहे.लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूबाबत सायकलने जनजागृती केली. दरम्यान, गरजू, अपंग, वृद्ध, परप्रांतीय श्रमिकांना अन्नदान केले. पशू, प्राण्यांवर कोविड १९ च्या लसीचे परीक्षण होणे हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आम्ही शरीर परीक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.- राजेंद्रसिंह बघेल, चपराशीपुरा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं