शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सांगा ! एक लाखात घरकूल बांधावं कसं ?

By admin | Updated: May 30, 2016 23:59 IST

एकही आदिवासी बेघर राहू नये, असे राज्य शासनाचे धोरण असले तरी एक लाख रूपयांत घरकूल बांधावे कसे, असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.

आदिवासींचा सवाल : बांधकाम साहित्याचे दर वाढले अमरावती : एकही आदिवासी बेघर राहू नये, असे राज्य शासनाचे धोरण असले तरी एक लाख रूपयांत घरकूल बांधावे कसे, असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे घरकूल योजनेसाठी किमान दोन लाखांपेक्षा अधिक अनुदान द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.आदिवासींसाठी शबरी घरकूल योजना, पारधी पॅकेज अंतर्गत घरकूल योजना, आदिम जमाती घरकूल योजना सुरू करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी रविवारी पुण्याच्या बालेवाडीत ‘पेसा’ योजनेतून आदिवासींचा विकास साधण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे आदिवासी विकास विभागाला अवगत केले. भविष्यात एकही आदिवासी बेघर राहता कामा नये, त्यासाठी गाव-खेड्यात घरकुलांची निर्मिती करून आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचे सूतोवाच त्यांनी केले. मात्र, या घरकूल योजनेसाठी तोकडे अनुदान असताना याकडे मुख्यमंत्र्यांचे फारसे लक्ष नाही. तथापि ही बाब आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री सावरा यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. शासनाने घरकूल योजनेसाठी १ लाख रूपयांचे अनुदान मंजूर केले. मात्र, बांधकाम साहित्याचे दर वधारल्याने एक लाख रूपयांमध्ये घरकूल बांधणे शक्य नाही. आदिवासींसाठी योजना सुरू करताना मोठा गाजावाजा केला जात असला तरी अनुदान देताना हात आखडता घेतला जातो. त्यामुळे घरकूल योजनेसाठी अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी आहे. शहरी भागात अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजनेसाठी २ लाखांचे अनुदान दिले जाते. याच धर्तीवर आदिवासींच्या घरकूल योजनेला अनुदान देण्याची मागणी शेषराव मसराम यांनी केली आहे. (प्रतिनिधी)पारधी समाजाला हक्काचे घर का नाही ?जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, धारणी, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अमरावती, तिवसा, दर्यापूर आदी तालुक्यात पारधी समाज वास्तव्यास आहे. मात्र, पारधी समाजाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी यंत्रणा काम करीत नसल्याचा आरोप दिनेश विधाते यांनी केला आहे. वर्षानुवर्षे भीक मागून खाणे, कापडी तंबू, झोपड्यांमध्ये राहणे हा पारधी बांधवांचा शिरस्ता आहे.शासनाकडून आलेला निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना घरकूल निर्मितीसाठी पाठविला जातो. आदिवासी विकास विभाग केवळ यादी मंजूर करते. घरकुलांसाठी वाढीव निधी मिळाल्यास तशी कार्यवाही केली जाईल.- किशोर गुल्हाने, उपायुक्त, लेखा आदिवासी विकास विभागघरकूल योजनेसाठी एक लाख रुपयांचे अनुदान फारच तोकडे आहे. आगामी सत्रात घरकूल निर्मितीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान मान्य करावे, यासाठी आदिवासी आमदारांना एकत्रित आणले जाईल. शासनाला अनुदान वाढीबाबत तसे पटवून देऊ.- राजू तोडसाम, अध्यक्ष, आदिवासी आमदार समिती