शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार त्याला म्हणाले - तू आमच्या लेखी मयत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

धारणी येथील प्रभाग क्रमांक ११ येथील रहिवासी श्याम छोटेलाल मेटकर या ७० वर्षीय हातमजुरी करणाऱ्या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते धारणी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते. मात्र, जून-जुलै २०२० पासून त्यांचे निराधार योजनेतील वेतन बंद करण्यात आले. आपल्या खात्यात योजनेची रक्कम का येत नाही, याची विचारणा करण्यासाठी श्याम मेटकर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात गेले असता, त्यांना धक्काच बसला. 

श्यामकांत पाण्डेयलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : ‘साहब, अभी मै जिंदा हू. पता नही क्यू, तहसील वालोने मुझे कागज पर मार डाला’, अशा शब्दांमध्ये धारणी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वृद्धाने आर्त हाक दिली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. धारणी येथील प्रभाग क्रमांक ११ येथील रहिवासी श्याम छोटेलाल मेटकर या ७० वर्षीय हातमजुरी करणाऱ्या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते धारणी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते. मात्र, जून-जुलै २०२० पासून त्यांचे निराधार योजनेतील वेतन बंद करण्यात आले. आपल्या खात्यात योजनेची रक्कम का येत नाही, याची विचारणा करण्यासाठी श्याम मेटकर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात गेले असता, त्यांना धक्काच बसला. तहसील कार्यालयाच्या यादीमध्ये श्याम मेटकर यांच्या नावापुढे मृत अशी नोंद आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून त्यांनाच सांगण्यात आले. आपण जिवंत असताना मृत दाखविण्यात आले, हे ऐकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे धाव घेतली.आमदार पटेल यांनी श्याम मेटकर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांचे सहायक सुरेंद्र देशमुख यांना याप्रकरणी निर्देश देऊन धारणी पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानुसार मेटकर यांनी आपल्याला जिवंतपणी मारणाऱ्या व सरकारी अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करून थकीत असलेली संजय गांधी निराधार योजनेची रक्कम मिळवून देण्याचे निवेदन पोलीस ठाण्यात दिले. या प्रकरणामुळे धारणी तहसील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. याबाबत प्रभारी तहसीलदारांनी हात झटकले आहेत. विशेष म्हणजे, प्रभारी तहसीलदार अनिल नाडेकर हेच धारणी तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ते श्याम मेटकर हे मृत असल्याचा अहवाल पाठविणाऱ्या संबंधित तलाठ्याविरुद्द्ध काय कारवाई करतात, याकडे मेटकर यांच्यासह धारणीवासीयांचे लक्ष लागले आहे. 

सध्या माझ्याकडे प्रभारी तहसीलदाराचे काम आहे. श्याम मेटकर याच्या प्रकरणी तलाठी धारणी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे . परंतु आता प्रत्यक्ष व्यक्ती उपस्थित झाल्यामुळे त्याचे प्रकरण पुन्हा सुरू करण्यात येत आहे .- अनिल नाडेकर, तहसीलदार 

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदार