शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांची तारांबळ

By admin | Updated: May 22, 2014 22:26 IST

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झाल्याने अनेक उमेदवारांची प्रचारासाठी तारांबळ उडणार आहे.

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झाल्याने अनेक उमेदवारांची प्रचारासाठी तारांबळ उडणार आहे. २० जून रोजी मतदान होणार असून, २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या शाळेत शिक्षकच नसल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष संपर्क मोहीमच राबवावी लागणार आहे.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या संपर्क मोहिमेला वेग आला आहे. यंदा शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांनीही थेट रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीतील सामना रंगणार आहे. काही उमेदवारांनी तर दोन महिन्यांपासून मतदारांच्या भेटी घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. अनेक उमेदवारांना जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मतदान होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार अनेकांनी प्रचाराचेही नियोजन केले होते. ९ जूनपासून सिनिअर व ज्युनिअर कॉलेज सुरू होणार असून, २६ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. मात्र २० जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीतील जवळपास ६० टक्के मतदार हे हायस्कूल टिचर असल्याने त्यांच्याशी सध्या संपर्क साधणे हे उमेदवारांसमोर एक आव्हानच आहे.

** कॉर्नर मीटिंगचे आयोजन...
शाळांना सुटी असल्याने हायस्कूल टिचर्सशी सहज संपर्क साधणे उमेदवारांना शक्य होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. यापूर्वी उमेदवार शाळा सुरू असताना शाळेत जाऊन शिक्षकांशी संपर्क साधणे अथवा त्यांना बैठकांचा निरोप देत होते. मात्र आता शाळांना सुटी असल्याने कॉर्नर मीटिंग घेणे, गाव अथवा शहरात संपर्क यात्रा काढण्यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे.