मुख्याधिकार्‍यांच्या कक्षाबाहेर टांगला कंदील!

By Admin | Updated: May 22, 2014 23:25 IST2014-05-22T23:25:18+5:302014-05-22T23:25:18+5:30

मुख्य मार्गाच्या रस्ता दुभाजकावरील पथदीवे, सिव्हिल लाईन, इंदिरानगरमधील पथदीप गेल्या महिन्याभरापासून बंद आहेत. या प्रकरणाची दखल पालिका मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी

Tangla lantern outside headquarters! | मुख्याधिकार्‍यांच्या कक्षाबाहेर टांगला कंदील!

मुख्याधिकार्‍यांच्या कक्षाबाहेर टांगला कंदील!

दर्यापूर : मुख्य मार्गाच्या रस्ता दुभाजकावरील पथदीवे, सिव्हिल लाईन, इंदिरानगरमधील पथदीप गेल्या महिन्याभरापासून बंद आहेत. या प्रकरणाची दखल पालिका मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी न घेतल्यामुळे बांधकाम सभापती शिवाजी देशमुख यांनी मुख्याधिकार्‍याच्या कक्षाबाहेर कंदील टांगून निषेध व्यक्त केला. यावेळी बांधकाम सभापती व मुख्याधिकार्‍यांमध्ये बाचाबाची झाली. शहराच्या विविध भागातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याची तक्रार नगरेसवक तथा बांधकाम सभापती शिवाजी देशमुख यांनी मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्याकडे केली होती. मात्र मुख्याधिकार्‍यांनी ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. याचा निषेध म्हणून पानझाडे यांनी मुख्याधिकार्‍यांना कंदील भेट देण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकार्‍यांनी कंदीलही नाकारला. त्यामुळे बांधकाम सभापती व मुख्याधिकार्‍यांमध्ये तू-तू, मै-मै झाली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. नगरपालीकेकडे वीज वितरण कंपनीचे १४ लाख ४२ हजार १०९ रुपये थकित असून त्यापैकी ९ लाख १० हजार २९८ रुपये १३ वित्त आयोगातून देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. ही रक्कम लवकरच वीज वितरण कंपनीला देण्यात येईल. शहरातील पथदीव्यांच्या वायरिंगमध्ये तांत्रिक अडचणी आल्या असून ते दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Tangla lantern outside headquarters!