टाकळी जहागीर हादरले! ७० वर्षीय पतीचा पत्नीवर खुनी हल्ला; स्वतःही संपविण्याचा केला प्रयत्न
By प्रदीप भाकरे | Updated: May 15, 2026 23:40 IST2026-05-15T23:40:44+5:302026-05-15T23:40:57+5:30
परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टाकळी जहागीर हादरले! ७० वर्षीय पतीचा पत्नीवर खुनी हल्ला; स्वतःही संपविण्याचा केला प्रयत्न
प्रदीप भाकरे, अमरावती : जिल्ह्यातील टाकळी जहागीर येथे एका वृद्ध पतीने आपल्या ६० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली. या थरारक घटनेनंतर आरोपी पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमनगर परिसरातील बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या राजकन्या अर्जुनराव सोनोने (६०) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, राजकन्या या पालथ्या अवस्थेत पडलेल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून, पती अर्जुनराव नामदेवराव सोनोने (७०) यांनीच पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीला संपवल्यानंतर अर्जुनराव यांनी स्वतः तणनाशक प्राशन केले. त्यांचा मोठा मुलगा रावसाहेब सोनोने याने वडिलांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले असून, सध्या ते पोलीस निगराणीखाली उपचार घेत आहेत.
याप्रकरणी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास नांदगाव पेठ पोलिसांनी मृताच्या सुनेच्या तक्रारीवरून कोणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले तथा आरोपी मारे कार्याला तातडीने दवाखान्यात हलविले.