तडीपार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST2021-09-16T04:16:57+5:302021-09-16T04:16:57+5:30

परतवाडा : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसमाला तडीपार करूनसुद्धा तो पुन्हा पेट्रोलिंगदरम्यान रविवारी रात्री आढळून आल्याने अटक करण्यात आली. ...

Tadipar accused arrested | तडीपार आरोपीस अटक

तडीपार आरोपीस अटक

परतवाडा : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसमाला तडीपार करूनसुद्धा तो पुन्हा पेट्रोलिंगदरम्यान रविवारी रात्री आढळून आल्याने अटक करण्यात आली.

गजानन रामदास खडके (२६, रा. अब्बासपुरा) याच्याविरुद्ध शरीराविरोधी व मालमत्तेविरोधी गुन्हे दाखल असल्याने व तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याच्या कारणावरून अचलपूर उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले होते. १२ सप्टेंबर रोजी तो रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना अचलपूर शहरात आढळून आला. त्यावरून ताब्यात घेऊन तडीपारीसंबंधी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत त्याच्याविरुद्ध कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार जमील शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जमादार दादाराव वानखडे, सुभाष बादशे, सिद्धांत ढोले, सचिन कोकणे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Tadipar accused arrested