शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीतील बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: June 2, 2016 01:36 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध विभागातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात समुपदेशनाव्दारे बदल्या करण्यात आल्या.

आदेश : मेळघाट आदिवासी परिषदेने दाखल केली याचिकाअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध विभागातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात समुपदेशनाव्दारे बदल्या करण्यात आल्या. बदल्या करताना मेळघाटातील रिक्त पदे ‘पेसा’ कायद्यानुसार कशी भरणार? याबाबत मेळघाट आदिवासी विद्यार्थी परिषदेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील बदल्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे.परिणामी बदली झालेल्या काही संवर्गातील कर्मचाऱ्यांना सध्या कार्यमुक्त करू नयेत, अशा सूचनाही सीईओंनी संबंधित विभागप्रमुखांना लेखी स्वरूपात दिल्या आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन विभाग आणि शिक्षण या विभागातील विविध पदामवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे यंदाही समुपदेशनाव्दारे राबविली गेली. यानुसार प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व काही आपसी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्यसेवक पुरूष, आरोग्यसेवक महिला, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक व शिक्षक अशा कर्मचाऱ्यांच्या मेळघाटसह जिल्ह्यातील विविध भागात बदल्या केल्या आहेत. बदल्या करतांना जिल्हा परिषद प्रशासनाने शासनादेशानुसार मेळघाट क्षेत्रात ‘पेसा’ कायद्यांतर्गत आदिवासीबहुल भागातील रिक्त पदे स्थानिक युवकांच्या माध्यमातून भरण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने मेळघाट क्षेत्रातील रिक्त पदांसह अन्य ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना याचा कुठलाही विचार केला नाही. त्यामुळे पेसा कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या बदली प्रक्रियेत स्थानिकांवर अन्याय होणार असल्याने या विरोधात आदिवासी विद्यार्थी परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या रिट याचिकेच्या अनुषंगाने सर्वसाधारण बदली प्रक्रिया मे २०१६ मध्ये समुपदेशनाव्दारे संवर्गनिहाय जसे प्रशासकीय, विनंती, आपसी पद्धतीने राबविण्यात आली. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार ‘पेसा’ अंतर्गत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगनादेश दिल्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, शिक्षक आदींना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त न करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.