शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थगिती’वरून गदारोळ

By admin | Updated: June 17, 2014 23:59 IST

आमसभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून मंगळवारी महापालिकेत गदारोळ झाला. भाजप-सेना, बसपा-रिपाइं, राष्ट्रवादी फ्रंट एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जुंपली. गदारोळ सुरू

मित्र बनले शत्रू : गटनेता पदाच्या घोषणेवरुन राजकारण
अमरावती : आमसभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून मंगळवारी महापालिकेत गदारोळ झाला. भाजप-सेना, बसपा-रिपाइं, राष्ट्रवादी फ्रंट एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जुंपली. गदारोळ सुरू असताना पीठासीन सभापती उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता म्हणून सुनील काळे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेवर आक्षेपही नोंदविला गेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या आमसभेत पीठासीनावर महापौर वंदना कंगाले, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, आयुक्त अरूण डोंगरे, नगरसचिव मदन तांबेकर हे विराजमान होते.
आमसभेच्या प्रारंभीच भाजपाचे गटनेता संजय अग्रवाल यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या श्रध्दांजलीचे प्रस्ताव मंजूर करून सभा स्थगित करावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे, चेतन पवार, बाळू भुयार, मिलिंद बांबल यांनी अनुमोदन दिले. मात्र सभा स्थगित करण्याच्या मुद्यावरून सुनील काळे यांनी आक्षेप घेतला. तेव्हा भाजप-सेना, रिपाइं, बसपा, जनविकास काँग्रेसचे सदस्य महापौरांच्या पीठासनासमोर एकत्र येऊन सभा स्थगित करण्याची मागणी करू लागले. एका बाजूने कामकाज सुरू रहावे तर दुसऱ्या बाजूने सभा स्थगित व्हावी हा वाद अर्धा तासपर्यंत सुरूच राहिला. अखेर महापौर वंदना कंगाले यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. महापौर कंगाले यांनी सभागृह सोडताच पाच ते सात मिनिटांच्या आत पीठासीनावर उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे विराजमान झाले. त्यांनी स्वत:हून कामकाज सुरू केले.
गोंधळ सुरू असताना विभागीय आयुक्तांकडून आलेल्या पत्राचे त्यांनी वाचनही केले. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर चर्चेत तुषार भारतीय, प्रकाश बनसोड, चेतन पवार, विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, सुनील काळे, विजय नागपुरे, राजेंद्र तायडे, कांचन ग्रेसपुंजे, दीपक पाटील, रीना नंदा, सुजाता झाडे, वंदना हरणे, प्रशांत वानखडे, बबलू शेखावत यांनी सहभाग घेत मुंडे यांच्या कार्यकर्तुत्वाचा लेखाजोखा मांडला. या प्रस्तावानंतर सभा स्थगित करण्यात आली.