शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील कनिष्ठ लिपीक निलंबित

By admin | Updated: May 3, 2016 00:19 IST

कार्यालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या अनुप भगवान सारवान या कनिष्ठ लिपिकाला सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

आयुक्तांची कारवाई : कार्यालयात गैरहजर राहणे भोवलेअमरावती : कार्यालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या अनुप भगवान सारवान या कनिष्ठ लिपिकाला सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. महापालिकेतील कार्यकारी अभियंता २ या कार्यालयात कार्यरत असलेल्या सारवान यांच्या निलंबनाचा आदेश महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी काढला. २९ एप्रिल रोजी रमाई आवास योजनेसंबंधी झालेली बैठक आणि वैयक्तिक शौचालयाविषयी ३० एप्रिलच्या सभेत प्राथमिक स्वरुपात किती लाभार्थ्यांची यादी ठेवावी, यासंबंधी घेतलेल्या आढावा बैठकीत सारवान हे समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. अनुप सारवान हे शौचालयाच्या पुढील टप्पा देण्याबाबतही टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी घरकूल, शौचालय योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वेळेवर मंजूर निधीचे धनादेश मिळत नसल्यामुळे त्यांच्याबाबत तक्रारी झाल्यात. यासंबंधाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तथापि त्यांनी खुलासा सादर केला नाही. कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु ते हजर नसल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी कार्यालयीन कामात अडथळा निर्माण केला, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. अनुप सारवान यांची वागणूक कार्यालयीन शिस्तीला अनुसरुन नसून त्यांनी मनासे (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ (१) (२) (३) चे उल्लंघन केले, असा ठपका ठेऊन सारवान यांना तत्काळ निलंबित करीत असल्याचा आदेश सोमवारी आयुक्तांनी पारित केला. निलंबन काळात ते मुख्यालय झोन क्र. ३ येथे राहतील. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.