शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST

टाकरखेडा शंभू : भातकुली तकलुक्यातील आष्टी फाटा ते साऊर या आठ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून ...

टाकरखेडा शंभू : भातकुली तकलुक्यातील आष्टी फाटा ते साऊर या आठ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

धारणीतील गल्लीबोळात अतिक्रमणाचा सपाटा

धारणी : शहरातील मोक्याच्या जागा अन्य लोकांनी बळकावल्याने स्थानिकांनाच जागा मिळेनाशी झाली आहे. मोक्याच्या जागांवर मोठे दुकानदार दुकाने थाटून बसतात. त्याकडे नगरपंचायतने दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे धारणीतील गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा घट्ट झाला आहे.

------------------

बांधावरच भाजीपाला विक्रीला प्रतिसाद

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील २०० शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावरच भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत तालुक्यातील तब्बल दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-----------------------------.

दाभाडा, कावली, जुना धामणगाव रस्ता खड्ड्यात

कावली वसाड : जुना धामणगाव ते कावली हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. वाहनचालक व पादचाऱ्यांना या मार्गावरून कसरत करून प्रवास करावा लागतो. गतवर्षी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु, गेल्या लॉकडाऊन काळात काम बंद पडले. रस्त्याची गिट्टी मोठ्या प्रमाणात उघडी पडली आहे.

-----------------

शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई

चांदूर रेल्वे : तालुक्यात १८ मार्च रोजी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. हलक्या स्वरूपाच्या गाराही पडल्या. त्यामुळे हाताशी आलेला गहू आणि हरबरा या पिकाचे मोठे नुकसान झाले. आमला, मालखेड, बासलापूर, जळका जगताप यांसह अनेक भागांत गव्हाचे नुकसान झाले. त्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळालेली नाही.

-----------------

ग्रामीण भागात वीज कापण्याची मोहीम

अंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गामुळे एक वर्षापासूनची बिकट परिस्थिती, पिकांचे नुकसान व मजूर वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे स्वत:चा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात महावितरणने बिल थकलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. लॉकडाऊन पुन्हा लागल्याने शेतकरी, सामान्य वीजग्राहक हवालदिल झाले आहेत.

---------------

शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद

वरूड : तालुक्यातील दाभी आणि केकतवाडा शिवारात ये-जा करण्याकरिता असलेला रस्ता दाभी सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे पाण्याखाली आल्याने शेतात ये-जा बंद झाली. वहिवाट रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला असून, शेतकरी जीव धोक्यात घालून शेत काम करीत आहेत.

-------------

महसूल आणि गाव पथके गेली कुठे?

अचलपूर : रेतीची चोरी थांबवण्यासाठी कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार अशी यंत्रणा असताना, रेती चोरी मात्र बिनबोभाट सुरू आहे. तालुक्यातील पूर्णा नदीपात्रासह ठिकठिकाणी मोठे खड्डे करून दिवस-रात्र सुरू असलेल्या रेती चोरीवर बोटावर मोजण्याइतपत कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे ही पथके गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

--------------------------

संत्रा उत्पादकांना हवा मदतीचा हात

ब्राह्मणवाडा थडी : परिसरातील शिरजगाव, करजगाव, वणी, सर्फापूर, अलमपूर, सोनोरी, विश्रोळी या भागांमध्ये २० मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. पाच ते दहा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे हरभरा, गहू, कांदे, भाजीपाला, संत्री या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.

------------------

आसेगाव ग्रामपंचायत झाली आयएसओ

आसेगाव पूर्णा : स्थानिक आसेगाव पूर्णा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. सरपंच कांचन रघुवंशी, उपसरपंच सुधीर वाटाणे, ग्रामविस्तार अधिकारी भुस्कट, ग्रामपंचायत सदस्य कोकिळा इसळ, सुनीता खराटे, प्रवीण गजभिये, बेबी ठाकरे, सुनीता गवई, मुक्ता मानकर, शोभा शिरभाते, मनोज वाटाणे यांनी ते मानांकन स्वीकारले.

------------------

महसूलची कारवाई थंडबस्त्यात

भातकुली : घरकुलासाठी रेती उपलब्ध करण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांची वणवण महसूलला दिसत नाही. मात्र, त्याच वेळी तालुक्यातील पेढी नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना, वाहतूक सुरू असताना, महसूल विभागाने मौन धारण केले आहे.

-------------------

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे जतन करा

धामणगाव रेल्वे : यंदा खरीप हंगामामधील उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे, त्यांनी तालुक्यातील कृषिसहायकांकडून तपासणी करून आगामी हंगामासाठी जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धामणगाव तालुक्यात सन २०२१-२२ या खरीप हंगामात अंदाजे २३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड होईल, असे अपेक्षित धरून तालुक्यात २७ हजार ३२५ क्विंटल बियाणे लागणार आहे.

-------------------------

बँक, कार्यालयासमोर पार्किंगचा प्रश्न

दर्यापूर : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने विविध शासकीय कार्यालयांसह रुग्णालय व बँकांसमोर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक बँकांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत असलेल्या पार्किंगच्या समस्येवर पालिका व पोलीस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.

------

अमडापूरचा पूल संरक्षण भिंतीविना

राजुरा बाजार : वरूड-राजुरा राज्य महामार्गावर अमडापूर निर्माणाधीन पुलानजीक पूरसंरक्षण भिंत न उभारल्यास अमडापूर गावाला पुराच्या पाण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अमडापूर-राजुरा चुडामनी नदीवरील राज्य महामार्ग क्र २४४ वरील अमडापूरच्या जीर्ण झालेल्या पुलाला पर्यायी पूल म्हणून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.

-------------------

निवड

फोटो पी १७ भुरे

देवेंद्र भुरे

तळेगाव ठाकूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत देवेंद्र सुदामराव भुरे यांनी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विद्याविहार विद्यालयाचे सचिव भैयासाहेब ठाकूर, मुख्याध्यापक एस.एम. ढोके, शरद पवार, निंघोट, अनिल भारती, कौशल गोडचोर, चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.

------------

फोटो पी १७ दहिगाव रेचा

ज्ञानज्योती वाचनालयाला मिळाली नवी इमारत

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते पार पाडला. दहिगाव रेचा येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रयत्नाने १९७९ साली या वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती. कार्यक्रमाला ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, भुजंगराव शेरकर, गजानन काळमेघ, शालिकराम गिते, गणेश सावरकर, संजय रेचे, अशोक चरपे, रमेश रेचे, संजय भगत, सरपंच सुनंदा खेडकर, उपसरपंच विशाल इंगले, उदय साबळे, उद्धव गिते, निवृत्ती सावरकर उपस्थित होते.