शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सवलत योजनेसाठी अभ्यास समिती

By admin | Updated: May 16, 2016 00:04 IST

राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बस प्रवाशासाठी विद्यार्थी ते ज्येष्ठांपर्यंत दिल्या जाणाऱ्या सवलतीपोटी जवळपास २८०० कोटी रुपये सरकारच्या विविध विभागांकडे थकीत आहेत.

२८०० कोटी थकीत : विद्यार्थी, ज्येष्ठ, अपंगांच्या योजनेवर पुनर्विचारअमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बस प्रवाशासाठी विद्यार्थी ते ज्येष्ठांपर्यंत दिल्या जाणाऱ्या सवलतीपोटी जवळपास २८०० कोटी रुपये सरकारच्या विविध विभागांकडे थकीत आहेत. आता सवलती योजना सुरु अथवा बंद? याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यापुढे सवलती योजनांचे उत्तरदायीत्व एसटीकडे राहणार आहे.राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडे दोन वर्षांपासून सवलतीपोटी थकीत असलेल्या रक्कमेचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समितीचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी. गत २० वर्षांपासून समाजातील विविध घटकांसाठी सवलत देत आहे. ज्या विभागाकडून सवलती दिल्या जातात, त्या विभागाकडून राज्य परिवहन महामंडळाला ती रक्कम वळती करणे अनिवार्य आहे. मात्र, दोन वर्षांपासून सवलतींचे २८०० कोटी रुपये एसटीला देण्यात आले नाही. अगोदरच राज्य परिवहन महामंडळाचा कारभार ‘आॅक्सिजन’वर सुरू असताना सवलतींच्या थकीत रक्कमेमुळे एसटीची चाके थांबतील तर नाही ना, असा संशय वर्तविला जात आहे. सवलतींचे २८०० कोटी एसटीला मिळाले नाही, तर ही योजना बंद करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने मध्यंतरी शासनाला दिला होता. सवलत योजना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अंध- अपंग आदी घटकांसाठी लागू असून ही योजना निरतंरपणे सुरू ठेवावी अथवा नाही? याचा अभ्यास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानुसार एसटी सवलत योजनेबाबत विचार करेल, असे संकेत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या १७ सदस्य संख्या असलेली ही अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून १२०० कोटी, शिक्षण विभागकडे १३०० कोटी जवळपास थकीत आहे. महिला व बालकल्याण, आदिवासी विकास कल्याण विभाग, क्रीडा विभाग यांच्याकडून जाहीर केलेल्या योजनांनुसार २ वर्षांचे कोट्यवधी रुपये घेणे बाकी आहे. विविध विभागाकडून सवलतींच्या योजना जाहीर केल्या जातात; पण आर्थिक वर्षअखेर ही रक्कम वळती केली जात नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सवलतीच्या योजना चालू अथवा बंद कराव्यात, हे निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनाने दिले आहे. सवलती योजनांचा अभ्यास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अभ्यास समिती गठीत केली आहे. येत्या तीन महिन्यात अभ्यास समितीच्या अहवालानुसार राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनास सवलती योजनांबाबत आढावा घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. (प्रतिनिधी)सवलती योजनांमधील बनवाबनवी होणार बंद एसटीच्या सवलती योजनांमध्ये सुरू असलेली बनवाबनवी बंद करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. ज्या घटकांसाठी सवलत सुरु आहे, ती रक्कम त्या विभागाकडे वळती केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सवलतीची रक्कम शाळांमध्ये पाठविली जाईल. यापूर्वी अपंगांचे बनावट दाखले गोळा करुन सवलती घेण्यात आल्यात ही सर्व बनवाबनवी बंद करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पाऊल उचलले आहे.