शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून अनोळखी इसमाची हत्या

By admin | Updated: January 5, 2016 00:18 IST

एक्सप्रेस महामार्गालगत ३५ वर्षीय अनोळखी इसमाची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची घटना ४ जानेवारी रोजी उघडकीस आली.

बडनेरा येथील घटना : इसम ट्रकचा क्लिनर असल्याचा अंदाजबडनेरा : एक्सप्रेस महामार्गालगत ३५ वर्षीय अनोळखी इसमाची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची घटना ४ जानेवारी रोजी उघडकीस आली. सदर प्रकरणी बडनेरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आढळला. वरुडा गावापासून जाणाऱ्या एक्स्प्रेस महामार्गावर मृतदेह आढळून असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना ४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास कळली. महामागाच्या कडेला असणाऱ्या ३० ते ३५ वर्षीय इसमाच्या डोक्याला जबर मार होता. त्याचे डोके दगडाने ठेचल्याने चित्र होते. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले दगड होते. घटनास्थळी पोलीस सहायक आयुक्त महेश जोशी, पोलीस निरीक्षक विजय साळुंखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील पोहचले होते. मृत अनोळखी इसमाच्या हातावर मनोज असे नाव गोंदले आहे. त्याने पांढऱ्या रेखा असणाऱ्या शर्ट, भुरकट पॅन्ट, काळे जोडे परिधान केले आहे. त्याच्या खिशात राजाशक्ती तंबाखु पुडी व चिल्लर पैसे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी श्वान पथक बोलविण्यात आले होते. श्वान थोड्या अंतरापर्यंत जाऊन थांबला. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील लोकांना मृतदेह दाखविण्यात आला. मृतदेह एखाद्या ट्रकचा क्लिनर असावा, असा कयास पोलिसांचा आहे. अद्याप पोलिसांच्या हाती या कुठलीच ठोस माहिती आलेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक साळुंखे करीत आहे.