शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयोजित करणार राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

By admin | Updated: December 12, 2015 00:07 IST

महापौर कला महोत्सव, राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासह विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

स्थायी समितीचा निर्णय : इतवारा बाजारात राबविणार प्रोजेक्ट अमरावती : महापौर कला महोत्सव, राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासह विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थानिक इतवारा बाजारात ‘आॅर्गेनिक मॅनेजमेंट सिस्टिम’ हा पायलट प्रोजेक्ट निर्माण करण्याला मान्यता प्रदान करण्यात आली.स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला दिगंबर डहाके, कुसूम साहू, योजना रेवस्कर, राजेंद्र तायडे, कांचन उपाध्याय, सुनीता भेले, भारत चव्हाण, शेख हमीद शद्दा, अंजली पांडे, अजय गोंडाणे, सारिका महल्ले, वंदना हरणे, हाफिजाबी युसूफ शहा, तुषार भारतीय आदी सदस्य उपस्थित होते.  

रस्त्याच्या कामासाठी मंजुरीअमरावती : कार्यक्रमपत्रिकेवरील विषय हाताळताना येथील हमालपुऱ्यात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सी.सी.रस्ता तयार करण्यासाठी ३९ लाख ७४ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. बिच्छुटेकडी येथे सी.सी. रोड आणि सी.डी.वर्कसाठी ई-निविदा प्रक्रियेने ४८ लाख २५ हजार रुपयांची विकासकामे, प्रभाग क्र. ३१ अंतर्गत दरकरारची कामे, नवसारी येथे पुंडलिक बाबानगर, उज्ज्ज्वल कॉलनी व अरुण कॉलनी येथे क्राँक्रीट रस्ता निर्मितीसाठी ३३ लाख ८३ हजार रुपयांच्या कामांना मान्यता प्रदान करण्यात आली. मौजे गंभीरपूर सर्व्हे क्र. ३०/१ या खासगी जागेमधील १८.०० मीटर डी. पी.रुंद रस्त्याखालील एकूण १६५६.०० जागेचा मोबदला ८ लाख ७६ हजार ९६ रुपये अदा करण्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. महापौर कला महोत्सवांतर्गत २६ डिसेंबर रोजी आयोजित अ.भा.मुशायरा व कवी संमेलनासाठी लागणाऱ्या पाच लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी प्रदान कोली. महापौर राज्यस्तरीय श्री शरीर सौष्ठव स्पर्धा येथील आझाद हिंद मंडळात होणार आहे. हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्याकरिता तीन लाखांच्या खर्चाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली.