कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमध्ये बुकिंगला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:01:13+5:30

अमरावती येथे आतापर्यंत बाहेरून औषधी मागविण्यात आल्या. तथापि, कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून बाहेर माल पाठविण्यासाठी बूकिंग करण्यात आले नव्हते. तथापि, गोंदिया येथे १५ पशुखाद्य बॉक्स पाठविण्यात आले आहेत. सिंभोरा धरणात उत्पादित मासे मुंबईला पाठविले. त्याकरिता बूकिंग झालेली आहे. रायपूर येथून अमरावतीत औषधी मागविल्याची माहिती आहे.

Start booking in Covid-19 parcel cargo train | कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमध्ये बुकिंगला प्रारंभ

कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमध्ये बुकिंगला प्रारंभ

ठळक मुद्देअहमदाबादहून आल्या औषधी : बडनेऱ्याहून मुंबईला पाठविले मासे, गोंदियाला पशुखाद्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्य रेल्वे विभागाने लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू, शेतमाल, औषधी व अन्य उत्पादनांची ने-आण करण्यासाठी कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेन सुरू केली. या ट्रेनने गत दोन दिवसांपासून बडनेरा रेल्वे स्थानकाहून पशुखाद्य, औषधी, मासे पाठविण्याचे बुकिंग करण्यात आली आहे. रेल्वेसाठी ही गूड न्यूज ठरत आहे.
अमरावती येथे आतापर्यंत बाहेरून औषधी मागविण्यात आल्या. तथापि, कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून बाहेर माल पाठविण्यासाठी बूकिंग करण्यात आले नव्हते. तथापि, गोंदिया येथे १५ पशुखाद्य बॉक्स पाठविण्यात आले आहेत. सिंभोरा धरणात उत्पादित मासे मुंबईला पाठविले. त्याकरिता बूकिंग झालेली आहे. रायपूर येथून अमरावतीत औषधी मागविल्याची माहिती आहे.
दरम्यान, रेल्वेची आरएमएस सेवासुद्धा कार्गो ट्रेनमधून सुरू असल्याची माहिती पार्सल अधिकाऱ्यांनी दिली. दिवसाआड अहमदाबाद, राजकोट येथून अमरावतीत औषधांचे कार्टून मागविले जात आहे. रेल्वे बोर्डाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तंूची ने-आण सुरू ठेवली आहे. त्याकरिता प्रारंभी मालगाड्या सुरू ठेवल्या, तर आता व्यावसायीक, उद्योजक, शेतकºयांच्या सोईसाठी कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेन सुरू केली. मध्य रेल्वे भुसावळ विभागातून पोरबंदर, मुंबई, शालीमार, नागपूर यादरम्यान पार्सल पाठविता येणार आहे. मुंबई ते नागपूर, शालीमार ते मुंबई, पोरबंदर ते शालीमार या दरम्यान कार्गो रेल्वे ट्रेन ३ मेपर्यंत धावणार आहेत. मुंबई, कल्याण, इगतपुरी, नाशिक, जळगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर येथे या ट्रेनला थांबे देण्यात आले आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकावर आतापर्यंत औषधांचे ८०० कार्टून मागविण्यात आल्याची माहिती पार्सल विभागाचे प्रमुख चारदिवे यांनी दिली.

Web Title: Start booking in Covid-19 parcel cargo train

टॅग्स :railwayरेल्वे