शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखवली शून्य पदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:13 IST

आदिवासींचा अनुशेष ३,२६३ पदांचा : क्लास वनचे केवळ एक पद राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण मंजूर पदे १ लाख २२ हजार ८९३ आहेत. यातील ११ हजार १ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ७ हजार ७३८ आहे. पूर्वीचा अनुशेष ३ हजार २६३ पदांचा आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ६०१ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या शून्य दाखविण्यात आली आहे. 

आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागितली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण गट 'अ'ची १४७ पदे मंजूर आहेत. यात एसटी संवर्गाचे राखीव पद १ आहे. 

यापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या १ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या शून्य आहे. रिक्त पदही शून्य दाखवले आहे. गट 'ब' संवर्गात मंजूर पदे १ हजार ८५० आहेत. अनुसूचित जमातीची राखीव पदे ३४ आहेत, तर त्यापैकी भरलेल्या पदांची संख्या ७१ आहे. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेल्यांची संख्या १ आहे. रिक्त पदे शून्य दाखवली आहेत. 

गट 'क' संवर्गाची मंजूर पदे १ लाख ५ हजार ७३८ आहेत. त्यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे ९ हजार ६२३ आहेत. भरलेल्या पदांची संख्या ६ हजार ७५५ आहे. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेली ५५२ पदे आहेत. रिक्त झालेली पदे शून्य दाखविण्यात आली आहेत. गट 'ड' संवर्गाची मंजूर पदे १५ हजार १५८ आहेत. यापैकी एसटी संवर्गाची राखीव पदे १ हजार ३४३ आहेत. भरलेली पदे ९११ आहेत. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेली ४८, तर रिक्त पदे शून्य दाखवली आहेत. 

परिवहन महामंडळाला एकूण ७९१ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर घ्यायचे असून, सद्यस्थितीत ६०१ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर घेतलेले आहे. उर्वरित १५२ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षण, परवाना नूतनीकरण इत्यादी बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात येईल. तसेच न्यायप्रविष्ट ३८ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयानंतर अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात येईल, असे नमूद केले आहे. 

"अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर कार्यरत असलेल्या ६०१ बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यानंतर आदिवासी समाजाचे ६०१ बिंदू रिक्त व्हायला पाहिजे होते. परंतु, अनुसूचित जमातींचे बिंदूच रिकामे केले नाहीत. पदभरती कशी होईल. विशेष मोहीम राबवून आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्यात यावी." - सुंदरलाल उईके, अध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती शहर

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती