शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबीनचे दर पाच हजारांवर ; अजून किती वाढेल भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:39 IST

Amravati : सोयाबीनला आला उठाव, दरवाढीची शक्यता; ७५ टक्के शेतकऱ्यांकडील साठवणूक नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
तीन-साडेतीन वर्षापासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराने अखेर उसळी घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर ५,१०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे.

हमीभाव योजनेंतर्गत 'नाफेड'कडून जिल्ह्यात १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र, खासगी बाजारात सोयाबीनच्या दराने उसळी घेतल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेड आणि खासगी व्यापाऱ्यांचे दर १०० ते २०० रुपयांचे दरम्यान कमी-अधिक आहे. त्यामुळे केंद्रापेक्षा खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणत आहेत. अशा परिस्थितीत 'डीओसी'ची मागणी वाढली, शिवाय सरकी देखील महागली. त्यामुळे सोयाबीनला उठाव आला. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारात दर वाढल्याचे बोलले जात आहे.

सोयाबीन शेतकऱ्यांकडील संपल्यावर झाली दरवाढ

आर्थिक अडचणीमुळे ७० ते ७५ टक्के शेतकन्यांनी सोयाबीन आधीच विकून टाकले आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे थोडाफार साठा शिल्लक असताना दरवाढ झालेली आहे.

तीन वर्षांनंतर वाढले दर आवक मात्र कमी

तीन वर्षांपासून सोयाबीनचे दर ३,८०० ते ४,२०० रुपयांदरम्यान स्थिर होते. खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, सध्या दराने ५,३०० रुपयांची पातळी गाठली आहे. २०२१-२२ नंतर प्रथमच अशी तेजी पाहायला मिळत आहे.

१५ दिवसांत इतक्या रुपयांनी वधारला दर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांची भाववाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ४६०० ते ५,३०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

साठेबाजांचे फावणार?

शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर दर वाढण्याची ही जुनीच पद्धत यंदाही पाहायला मिळत आहे. आता व्यापाऱ्यांकडील आणि साठेबाजांकडील सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याने 'शेतकऱ्यांचे नुकसान आणि साठेबाजांचा फायदा' अशी स्थिती आहे.

पुढील काही दिवस दरात तेजी राहणार

आठवडाभरापासून सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनची आवक मंदावली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोयाबीनच्या दरात तेजी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तेल उद्योगांकडून मागणी वाढली

खाद्यतेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असताना तेलाची मागणी वाढली आहे. तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योगांनी कच्च्या मालासाठी अधिक खरेदी सुरू केल्याने बाजारात स्पर्धा वाढली, सोयापेंडचे दर वाढले, सरकीची दरवाढ झाली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.

सोयाबीन भाववाढीमागे नेमकी कारणे काय?

जागतिक बाजारपेठेत सोयापेंड आणि तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. यासह बाजारात सोयाबीनची आवक मंदावली असल्याने दरात तेजी आली आहे. तसेच सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात झालेली घट हेदेखील एक प्रमुख कारण मानले जात आहे.

"तीन वर्षांनी सोयाबीनला भाव चांगला मिळतोय; परंतु शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील सोयाबीन शिल्लक नाही. अडचणीतील शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन विकावे लागले."
- रमेश ठाकरे, शेतकरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge Past ₹5,000 After Three Years!

Web Summary : Soybean prices surged past ₹5,000 per quintal after three years of slump. Reduced supply, increased oil demand, and global market factors fueled the price rise. Farmers, however, have already sold most of their stock. Traders and stockists are likely to benefit most.
टॅग्स :SoybeanसोयाबीनAmravatiअमरावतीFarmerशेतकरी