शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावात सोयाबीनची आवक घटली

By admin | Updated: December 14, 2015 00:21 IST

कधी काळी या महिन्यात विक्रीस विक्रमी आवक राहणाऱ्या येथील बाजार समितीमधील सोयाबीनची आवक आता घटली असून त्यावर उत्पादन घटीचा परिणाम जाणवत आहे.

उत्पादन घटीचा परिणाम : ९ महिन्यांत १२ शेतकरी आत्महत्यानांदगाव खंडेश्वर : कधी काळी या महिन्यात विक्रीस विक्रमी आवक राहणाऱ्या येथील बाजार समितीमधील सोयाबीनची आवक आता घटली असून त्यावर उत्पादन घटीचा परिणाम जाणवत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचा हंगाम बुडाला. कित्येकांना एकरी फक्त एक ते दोन पोते सोयाबीनचे उत्पादन झाले तर काही शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन सोंगण्याचे काम पडले नाही. त्यामुळे यंदा भीषण दुष्काळाचे संकट कोसळले आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन असून या पिकांच्या भरवशावर त्याच्या प्रपंचाचा गाडा चालतो. पण दुष्काळामुळे या शेतकऱ्यांचा गाडा आर्थिक गर्तेत सापडला आहे.नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत सन २०१२-२०१३ च्या हंगामात डिसेंबर मध्ये सन २०१३-२०१४च्या डिसेंबर महिन्यात पंधराशे पोत्यांची आवक होती. सन २०१४-२०१५च्या डिसेंबरमध्ये चौदाशे पोत्याची आवक होती. यंदा याच महिन्यात ्फक्त पाचशे ते तीनशे पोत्यांची विक्री आवक असून इतकी घट झाली आहे. यावरुन दुष्काळाचे चित्र स्पष्ट होते. सध्या सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रतीक्विंटल भाव आहे.शेतकरी आत्महत्या चिंताजनकनऊ महिन्यांत १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यातील ११ शेतकरी आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्यात. यात १३ एप्रिल २०१५ ला निंभोरा लाहे येथील भाष्कर ढोरे, १५ एप्रिलला शिवणी येथील नामदेव वैद्य, २१ एप्रिल जावरा येथील प्रतापसिंग झाकर्डे, २१ मे २०१५ रोजी शिवरा येथील दादाराव काळबांडे, ८ जुलै रोजी २०१५ ला खेडपिंप्री येथील रुपराव शिरकरे, १५ जुलै २०१५ पापळ येथील अजय खरीपकर, ८ आॅगस्ट २०१५ ला खेडपिंप्री येथील रुपराव शिरकरे, आॅगस्ट २०१५ ला जनुना येथील दुर्जनसिंंग चंदेल, १९ आॅगस्ट रोजी सालोड येथील संजय इंझळकार, १८ सप्टेंबर रोजी टाकळी येथील अशोक वऱ्हेकर, १९ सप्टेंबरला खानापूर येथील नारायण पंशीरे, २९ सप्टेंबर अडगाव येथील रवी गजभिये, ३ डिसेंबरला फुबगाव येथील विजय राऊत यांनी कर्जापायी आत्महत्या केली आहे.यंदाचा दुष्काळ मागील तीन वर्षांच्या तुलनेत भयावह आहे. शासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर शेतकरी आत्महत्या वाढेल. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव व त्वरित नुकसानभरपाईची आर्थिक मदत द्यावी.- विलास चोपडे, सभापती, बाजार समिती, नांदगाव.